सोयगाव शहरात गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त रंगला पालखी सोहळा

ग्रंथ पारायनाने सांगता

आठवडा विशेष |ज्ञानेश्वर धोंडू पाटील
सोयगाव,ता.२५:शहरातील आमखेडा भागातील गजानन महाराज मंदिर संस्थान मध्ये प्रगट दिनानिमित्ताने तीन दिवसीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते,डोळ्यांचे पारणे फिटणारया या सोहळ्याचा समारोप सोमवारी १४१ व्या प्रगट दिनानिमित्ताने पालखी सोहळा काढून करण्यात आला.

गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्यानिमित्त सामुहिक ग्रंथ पारायण करण्यात आले,सोमवारी शहरातून पालखी सोहळा काढून या सोहळ्याचा समारोप करण्यात आला,दरम्यान प्रगट दिनानिमित्त मंदिर संस्थानचं वतीने गजानन भक्तांचा सत्कार करण्यात आला.प्रगट दिनानिमित्ताने मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.यावेळी अरविंद कुलकर्णी यांच्या साई निरुपण करून समारोप करण्यात आला.यावेळी कुसुमताई वाडेकर प्रकाश झवर,राजू झवर,किशोर मंडेरा,सतीश झवर,सुभाष काळे,रघुनाथ वाडेकर,आदींनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *