चहा पित असून मी सुखरुप आहे ! ; विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा दुसरा व्हिडीओ

नवी दिल्ली : भारताने एअर स्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानने बदला घ्यायचा म्हणून भारतीय सीमेत घुसून बॉम्बने हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. या हल्ल्यात पाकिस्तानने भारतीय विमान पाडल्याचं बोललं जातंय. शिवाय दोन पायलट आमच्या ताब्यात असल्याचा दावाही पाकिस्तानने केला आहे. पण काही वेळातच दोन नसून एकच पायलट आमच्याकडे असल्याची माहिती पाकिस्तानने दिली. विशेष म्हणजे आमचा एक पायलट बेपत्ता असल्याची कबुली भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा दुसरा व्हिडीओ पाकिस्तानकडून जारी करण्यात आलाय. यामध्ये ते चहा पित असून मी सुखरुप असल्याचं सांगत आहेत. अभिनंदन यांच्याविषयी संपूर्ण देशाला चिंता वाटत आहे. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, पाकिस्तानकडून अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावला जाऊ शकत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *