पाटोदा तालुकाबीड जिल्हा

भगवान भक्तीगडावर अहोरात्र झटणारे समाजसेवक विजय गोल्हार यांची निस्वार्थी सेवा

पाटोदा (प्रतिनिधी) :गेल्या दोन वर्षांपासून सावरगांव घाट,ता.पाटोदा (जि.बीड) येथे राष्ट्रसंत भगवानबाबांच्या जन्मभूमीत ना.पंकजाताईसाहेब मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत लाखो भाविकांच्या साक्षीने ऐतिहासिक दसरा मेळावा घेतला जातोय. लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांनी सकल बहुजन समाजाला नवी ऊर्जा देण्याचं काम हयातभर याच दसरा मेळाव्यातून भगवानगडावरून केलं.परंतु काही कारणास्तव 2017 व 2018 चे दसरा मेळावे सावरगांव येथे घेण्यात आले व यापुढेही ते कायम असतील.
2017 चा पहिला मेळावा सावरगांवी झाला अन् लाखोंची गर्दी जमा झाली..गर्दीनं ताईसाहेबांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं.त्याचवेळी ताईंनी या ठिकाणावर संत भगवानबाबांची पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचत असलेली भव्य मूर्ती व ध्यानमंदिर होईल अशी मनातील भावना बोलून दाखवली.काम फार मोठे आहे हे माहित असल्याने 2018 च्या दसरा मेळ्याव्यापूर्वी सुरू केलेले काम अद्यापही सुरूच आहे.कारण त्यात आकर्षकता व अचूकता येणं महत्त्वाचं आहे.पुढच्या मेळाव्या वेळी जमलेला समुदाय हे काम पाहून नक्कीच ताईंचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.
या सर्व कामामध्ये रात्रं-दिवस थांबून,आपलं काम म्हणून,बाबांवरची निष्ठा म्हणून आणि ना.ताईसाहेबांचा आदेश म्हणून झटणारी एक व्यक्ती समाज पाहतोय तु म्हणजे विजय गोल्हार.कसल्याही स्वार्थाशिवाय स्वत: दिव्यांग असूनही भगवान भक्ती गडावर बायकाईने लक्ष ठेऊन असणा-या,प्रसंगी स्वत: काम करू लागणा-या गोल्हार यांच्या या समर्पणाची बात काही औरच.
विजय गोल्हार आणि गोपीनाथजी मुंडे साहेबांचे संबंध पिता-पुत्रासारखेच होते.साहेबांच्या जाण्यानंतर आईसाहेब,पंकजाताई,प्रितमताई,यशश्री आणि दोन्ही भाऊजी यांनीही गोल्हार यांना आपल्या घरातल्या सदस्यांपेक्षा कधीच कमी मानलं नाही.मुंडे भगिनींसाठी ते 'विजुभाऊ' आहेत.मुळात याच प्रेमाचं ऋण असल्याने आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मुंडे कुटुंबियांसाठी व्यतीत करण्याचा प्रण गोल्हार यांचा आहे.म्हणूनच भगवान भक्ती गडावर ते आजही अहोरात्र काम करताना,करून घेताना दिसतायेत.
भगवान भक्तीगड हा देशात चर्चिला गेला,जाईलही.पण जेव्हा कधी गडाचं नांव निघेल तेव्हा ना.पंकजाताईंच्या या व्यापक कल्पनेचं,दूरदृष्टीचं कौतुक केलं जाईल हे तर नक्कीच पण विजय गोल्हार या मुंडेभक्तानं केलेलं कणभर कामही भगवान भक्त,मुंडे भक्त,बहुजन समाज विसरणार नाही हेही खरंच!

बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.