औरंगाबाद जिल्हा

राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाची मराठवाडा विभागीय बैठक संपन्न

आठवडा विशेष | प्रतिनिधी

औरंगाबाद दि.२८: राष्ट्रवादी भवन, औरंगाबाद येथे राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाची मराठवाडा विभागीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत ग्रंथालय विभागाचे नुतन प्रदेशाध्यक्ष उमेशदादा पाटील साहेब, प्रदेश समन्वयक रिताताई बावीस्कर, उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते यांचा लातूर जिल्हा ग्रंथालय विभागाच्या वतीने राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे लातूर जिल्हाध्यक्ष नबीभाई सय्यद यांनी सत्कार केला.
तसेच मराठवाडा विभागाची घेण्यात आलेल्या बैठकीस चांगला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असुन मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेऊन प्रदेशाध्यक्ष उमेशदादा पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी पक्षाच्या पुढील कार्यासाठी मार्गदर्शन करुनपदाधिकाऱ्यांना सुचना केल्या. गाव तिथे ग्रंथालय, लोकसभा व विधानसभेचे नियोजन कसे करता येईल यावर विचार विनिमय करण्यात आले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष उमेशदादा पाटील साहेब, प्रदेश समन्वयक रीताताई बाविस्कर, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब बारहाते, प्रदेश सरचिटणीस महेश उबाळे, प्रदेश उपाध्यक्ष संतोष जरांगे, प्रदेश सरचिटणीस परवीन शेख, लातूर जिल्हाध्यक्ष सय्यद नबीभाई, कैलास पाटील, अवचरमल, नितीन वानखेडे, अनिता वानखेडे, बाळासाहेब नलावडे, श्री.सुधाकर जाधव, प्रभु नारायण वड, संतोष दगडगावकर, अमोल प्रताप, अशोक जाधव, भगवान भागवत अर्जुन बनाजी गळी, भाले गुरूजी, रामभाऊ बेलकर,शंकर ठाकुर, सुरेखा काळे, सय्यद समीर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.