सोयगाव,ता.१३:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― येथून जवळच असलेल्या बहुलखेडा ता.सोयगाव येथे सकारात्मक रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबाचे गुरुवारी अंटीजन तपासण्या केल्या असता,एकाच कुटुंबातील पाच जन सकारात्मक आढळले आहे.त्यामुळे तातडीने गावात ग्राम पंचायतीच्या वतीने प्रतिबंधित झोन तयार करून उपाय योजना हाती घेतल्या आहे.
बहुलखेडा ता.सोयगाव येथे एक रुग्ण सकारात्मक आढळल्यानंतर आरोग्य विभागाने या रुग्णाच्या अति जवळीक यादी तयार करून त्यांच्या तपासण्या केल्या त्यामध्ये पाच जन सकारात्मक आढळले आहे.या सर्व रुग्णांना सायंकाळी उशिरापर्यंत जरंडीच्या कोविड केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जरंडी कोविड केंद्रातील रुग्णांची संख्या आता ४० वर पोहचली असून अचानक वाढत्या रुग्ण्संख्येने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.