पाटोदा तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

पाटोदा येथील नगर पंचायतचे मुख्यधिकारी यांच्या वर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा

तहसील कार्यालयासमोर सोमीनाथ जावळे यांचे गोधडी पाल आंदोलन

पाटोदा ( शेख महेशर ) दि.२८ :रमाई आवास योजने चा दुसरा हप्ता मिळण्यासाठी वारंवार मुख्याधिकारी नगरपंचायत कडे चकरा मारून सुद्धा कसलेच प्रकारचे चेक मिळाले नाही त्या मुळे सोमीनाथ जावळे यांनी पाटोदा तहसील कार्यालयाच्या समोर गोधडी, पाल टाकून आज दिनांक २८/०२/२०१९ रोजी पासून आंदोलन सुरु केले आहे. दिनांक २०/०२/२०१९ रोजी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांनी दिनांक २५/०२/२०१९ रोजी दुसरा हप्त्याचा चेक देण्यात येईल असे लेखी आश्‍वासन सोमीनाथ जावळे यांना दिले होते. परंतु मुख्याधिकारी साहेब यांनी २५ फेब्रुवारी ही तारीख येऊन सुद्धा गेली परंतु त्यांना चेक देण्यास वेळ मिळाला नाही. त्या मुळे लाभार्थी जावळे यांनी तहसील कार्यालयासमोर गोधडी पाल आंदोलन सुरू केले आहे.
मी घराचे बांधकाम लेंटल लेवल पर्यंत पैसे व्याजाने उसनवारीने घेऊन पूर्ण केलेले आहे. परंतु मुख्याधिकारी नगर पंचायत कार्यालय हे या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत व चेक देण्यास नगरपंचायत चे मुख्याधिकारी टाळाटाळ करीत आहेत.व चेक देण्याचे खोटे आश्वासन देत आहे. त्या मुळे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणी साठी सोमीनाथ जावळे यांनी गोधडी, पाल आंदोलन तहसील कार्यालय पाटोदा येथे सुरू केलेले आहे. या आंदोलना दरम्यान लोकजनशक्ती पार्टी चे गोरख झेंड, सूनील जावळे, पवळे, सोनवणे, यांनी गोधडी पाल आंदोलनात सुकट भाजून सोमीनाथ जावळे यांच्या गोधडी पाल आंदोलनास पाठिंबा दिला आहे.


Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.