अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

योगेश्वरी रोटरीने तालुक्यातील ५ शाळांना दिल्या प्रत्येकी एक हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या भेट

अंबाजोगाई (आठवडा विशेष प्रतिनिधी) दि.२८ :येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योेगेश्वरीच्या वतीने तालुक्यातील कुंबेफळ , डोंगरपिंपळा,राजेवाडी, भारज आणि मांडवा पठाण या पाच शाळांना एक हजार लिटर क्षमतेच्या पाच पाण्याच्या टाक्या भेट देण्यात आल्या.ग्रामिण भागात शिकणा-या विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

कुंबेफळ येथील जयप्रभा माध्यमिक विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलासराव सोनवणे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.पृथ्वीराज साठे,शिवाजी खोगरे, नगरसेवक मिलींद बाबजे,मुरलीनाना तोडकर,सुर्यकांत कसबे,अशोक सोनवणे, मुख्याध्यापक बी.एस.पवार आदींची उपस्थिती होती.यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आर.एस.यादव यांनी केले तर उपस्थितांचे आभार बी.एस.मस्के यांनी मानले.भारज येथील कार्यक्रमात श्रीराम माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका एन.एल.ढाणे, अ‍ॅड.अनंतराव जगतकर,सदाशिव सोनवणे,शिक्षक टी.आर.गायकवाड, एन.डी.तिडके यांची उपस्थिती होती.
डोंगर पिंपळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित कार्यक्रमात जनार्धन मुंडे,दिलीप खांडेकर, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत साबळे , सहशिक्षक अनंत निकते,बालासाहेब भणगे हे उपस्थित होते. तसेच राजेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगीराज गडकर तर यावेळी अशोक गडकर, परमेश्वर गडकर, बालासाहेब गडकर, कृष्णा कदम,प्रविण काशिद,शिक्षक बळीराम गायके, बिभीषण सोमवंशी, पांडुरंग नरवडे, विजयकुमार रापतवार, बालासाहेब माने, श्रीनिवास मोरे आदींची उपस्थिती होती. तालुक्यातील मांडवा पठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.रुपालीताई राजेमाने तर प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक बबनराव लोमटे, सुधाकर जोगदंड, एस.जे.पवार, मुख्याध्यापक आर.एस.तट, पी.जे.चव्हाण,शालेय समिती सदस्य अफरोज पठाण,ईरे,मिलींद जोगदंड,अखिल पठाण, मोटे मामा,रूद्राक्ष, जाधव आदी उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई योगेश्वरीचे अध्यक्ष पांडुरंग पाखरे,सचिव सर्जेराव मोरे,नियोजित अध्यक्ष,सदाशिव सोनवणे,माजी अध्यक्ष श्रीरंग चौधरी,सदस्य जनार्धन मुंडे,धनराज मोरे,अ‍ॅड.अनंतराव जगतकर,मनोहर कदम, पुरूषोत्तम वाघ, धैर्यशील गायकवाड आदींसहीत इतरांनी पुढाकार घेतला.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.