पाटोदा तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकारण

राष्ट्रीय कॉग्रेसच्या पाटोदा तालुका अध्यक्ष पदी गणेश कवडे यांची निवड

➡ कवडे यांच्या निवडीने पाटोदा तालुक्यात जल्लोष

➡ स्वतःला मिळणारे पद युवानेते उमर चाऊस यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लडणार्या सामान्य कुटुंबातील गणेश कवडे सारख्या युवकाला पक्षाचे मोठे पद देऊन पुन्हा पाटोदा तालुक्यातील सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे सर्व सामान्याचे खंबीर नेतृत्व असल्याचे पुन्हा दाखवून दिले

पाटोदा (गणेश शेवाळे): पाटोदा तालुका राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या पाटोदा तालुका अध्यक्ष पदी गणेश कवडे यांची निवड झाल्याने त्यांच्या माध्यमातून पाटोदा कॉग्रेसला अच्छे दिन येणार असुन गणेश कवडे हे शुध्द चारित्र्याचे आणी चळवळीतील नेतृत्व असल्याने पक्ष वाढीस त्याची मोठी मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी गणेश कवडे यांनी अनेक आंदोलन केले असल्यामुळे कवडे यांची तालुका भरात ओळख असल्याने कॉग्रेस पक्षाला धाडसी व सर्व समाजात मिळुन मिसळून चालणारा चेहरा मिळाला असल्याने येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत यांचा मोठा फायदा होणार असुन पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी,माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण, माजी मंञी आशोक पाटील, माजी खासदार रजिणीताई पाटील,बीड जिल्हाचे नेते आशोक हिंगे व कॉग्रेस पक्षाचे नेते जुबेरभाई चाऊस,शिवाजी कोकाटे युवानेते राहुल भैय्या जाधव,उमर चाऊस यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सामान्य कुटुंबातील तळागाळातल्या कार्यकर्त्याला कॉग्रेस पक्षाने न्याय दिल्या मुळे येणाऱ्या निवडणूकीत यांचा चांगला फायदा होणार आहे गणेश कवडे यांच्या निवडी बद्दल त्याचे अभिनंदन माजी मंत्री आशोक पाटील, माजी खासदार रजिणीताई पाटील,युवानेते आदिते भैय्या पाटील,बीड जिल्हाचे कॉग्रेसचे नेते आशोक हिंगे व जुबेरभाई चाऊस, शिवाजी कोकाटे,युवानेते राहुल जाधव,उमर चाऊस यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर आपण देशाचे नेते राहुल गांधी,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माजी मंञी आशोक पाटील,माजी खासदार रजिणीताई पाटील आशोक हिंगे,जुबेरभाई चाऊस,शिवाजी कोकाटे, यांच्या मार्गदर्शनाखाली गोर गरीब जनतेची कामे पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचे आणि आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीतही पक्षाचाच उमेदवार निवडुन आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नूतन तालुका अध्यक्ष गणेश कवडे यांनी सांगितले असुन गणेश कवडे यांची निवड झाल्याने पाटोदा तालुक्यात जल्लोष साजरी होत आहे.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.