बीड जिल्हामहाराष्ट्र राज्यमाजळगाव तालुका

छत्रपती कारखान्यावर उसाच्या ट्रकचा टायर फुटून इसम मृत्युमुखी

माजलगाव (प्रतिनिधी) दि.२८ : तालुक्यातील सावरगाव येथे छत्रपती सहकारी साखर कारखाना येथे. उसाचा ट्रक चा पुढील टायर फुटून त्यांच्या रिंग ने बाजूच्या हॉटेल वर बसलेले गंगाधर पांडुरंग तिडके रा.भोगलवाडी ता.धारूर यांचा दुर्दैवी अंत झाला.
या विषयी अधिक वृत्त असे की, सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्याच्या एन्ट्री गेट जवळ राष्ट्रीय महामार्ग 222 वर दोन्ही बाजूने चहाचे हॉटेल आहेत.या ठिकानी आज 5.30 वाजता रामचंद्र वाघचौरे रा.भोपा ता.धारूर यांच्या मालकीचा उसाने भरलेला ट्रक MH.23.W.4043 हा कारखान्यात जाण्यासाठी मधी वळला त्या क्षणी ट्रक चा पुढील टायर फुटला व त्याचे रिंग जोरात उडून हॉटेल वर चहा घेण्यासाठी बसलेले गंगाधर पांडुरंग तिडके वय 35 रा. भोगलवाडी ता.धारूर यांच्यावर आदळून त्यात ते गंभीर जखमी झाले .त्यांना तात्काळ उपचारासाठी माजलगाव येथे आणले होते पण उपचार होण्याच्या पूर्वीचा त्याचा मृत्यू झाला. गंगाधर तीडके हे आपले मालकीचे वाहन वाहतुकीसाठी लावण्यास साखर कारखान्यावर आले होते असे प्रत्यक्ष दर्शी लोकाकडून समजले.


बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.