मोरेवाडी शिवारातील उभा ऊस जाळला ; शेतकरी अविनाशराव मोरे यांचे दोन लाखांचे नुकसान

अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.०१:मोरेवाडी शिवारातील सर्व्हे नं.540 मधील उभा असलेला तीन एकर ऊस अज्ञात व्यक्तिंनी मंगळवारी पहाटे जाळला असल्याची घटना घडली.यामुळे शेतकरी अविनाश पांडुरंगराव मोरे यांचे अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.मोरेवाडी शिवारातील हॉटेल अंजलीच्या पाठीमागील बाजूस शेतकरी अविनाश पांडुरंगराव मोरे यांची सर्व्हे नं.540 मध्ये तीन एकर तेवीस गुंठे शेतजमीन आहे.या शेतात त्यांनी ऊस लागवड केली आहे. मंगळवार,दि.27 फेब्रुवारी रोजी राञी बारा ते पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञातांनी शेतातील ऊभा असलेला ऊस पेटवला आहे.ज्यामुळे शेतकरी अविनाश पांडुरंगराव मोरे यांचे अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी औदुंबर अविनाशराव मोरे यांनी ऊस जळाल्याची व नुकसान झाल्याची माहीती लेखी स्वरूपात पोलिस निरीक्षक,शहर पोलिस ठाणे यांना दिली आहे.
ऊस जळीत प्रकरणाची चौकशी व कार्यवाही व्हावी
मोरेवाडी शिवारात यापुर्वी अशा घटना घडत नव्हत्या.परंतु, गेल्या काही दिवसांत
असे प्रकार वाढत आहेत.तेव्हा पोलिस प्रशासनाने ऊस जळीत प्रकरणाची सखोल चौकशी करावी जेणेकरून यापुर्वीही घडलेल्या घटनांचा उलगडा होईल तसेच मंगळवारी घडलेल्या या ऊस जळीत प्रकरणातील संबंधितांचा शोध घेवून कठोर कार्यवाही करावी.औदुंबर अविनाशराव मोरे
(तालुकाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
