अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांची निर्दोष मुक्तता ; प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांचा निकाल

आंबाजोगाई (प्रतिनिधी) :सन 2007 साली दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्यात प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा.श्री.ई.के.चौगले यांनी अंबाजोगाई येथील दै.झुंजार नेताचे पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांची निर्दोष मुक्तता केली.

या विषयी प्राप्त माहिती अशी की,दि.30 नोव्हेंबर 2007 रोजी तत्कालीन अंबाजोगाई पंचायत समितीच्या सभापती यांचे चिरंजीव बालासाहेब दशरथ शेप यांनी गैरसमजुतीमधून येथील दैनिक झुंजार नेताचे पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांच्या विरुद्ध गु.र.नं 345/2007 कलम 452, 385 भादंवी नुसार अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी पो.उ. नि.अदटराव यांनी येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अंबाजोगाई मा.श्री.ई.के.चौगले यांच्या न्यायालयात शासन विरुद्ध दत्तात्रय (केस न 1/2019) नुसार दत्तात्रय अंबेकर यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर झालेल्या सुनावणी नंतर न्या.ई.के.चौगले यांनी दत्तात्रय अंबेकर यांची या प्रकरणी निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणी दत्तात्रय अंबेकर यांच्या वतीने अॅड.व्ही डी शिंदे व अॅड.एस एस व्यवहारे यांनी बाजु मांडली.त्यांना अॅड.पी.एम. जोगदंड, अॅड.व्ही बी भुरे यांनी सहकार्य केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?



    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.