बीड जिल्हाशेतीविषयक

बीड जिल्ह्यात शेतकरी सन्मान निधी योजनेत ८१ टक्के शेतकऱ्यांची नोंदणी

आठवडा विशेष|प्रतिनिधी

बीड : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेत बीड जिल्ह्यातील 81 टक्के शेतकरी खातेदारांची माहिती नोंदणी करण्यात आली आहे योजनेसाठी जिल्ह्यातील महसूल ग्राम विकास व कृषी विभागाच्या वतीने कार्यवाही करण्यात येत आहे असे असे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले जिल्ह्यातील 6 लाख 51 हजार सातबारा धारक शेतकऱ्यांपैकी 2 लाख 05 हजार 282 शेतकरी कुटुंबाना 2 हजार रुपयाचा पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येत आहे.
या योजनेचा शुभारंभ झाल्यापासून यासाठी प्रशासनाच्या वतीने काम केले जात आहे प्रामुख्याने शेतकऱ्यांचे बँक खाते आधार क्रमांक आधी माहिती ती बिनचूक असल्यास त्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही परंतु यामध्ये येणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांनी आपली माहिती बिनचूक व परिपूर्ण उपलब्ध करून देणे गरजेचे आहे असे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी सांगितले मान्यवर व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विविध ठिकाणी एकाच दिवशी संपन्न झाला.
प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना 3 हप्त्यात 6 हजार रूपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता दिसून येत आहे याच वेळी जा पात्र लाभार्थ्यांना योजनेतील पहिल्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा झाल्याबाबतचे संदेश प्राप्त झाले आहेत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे यामध्ये बीड तालुक्यातील नामदेव मस्के, सखाराम ढोले, विनोद गायकवाड आधी शेतकऱ्यांनी योजनेबद्दल समाधान व्यक्त केले आहे
ज्या शेतकरी कुटुंबाची विविध ठिकाणी मिळून 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेती आहे अशा कुटुंबाची स्वतंत्र यादी तयार केली आहे. पात्र खातेदाराचे नाव, लिंग, जातीचा प्रवर्ग, बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड, आधार क्रमांक ओळखपत्र, जन्म दिनांक आणि भ्रमणध्वनी क्रमांक आदिची माहिती पीएम किसान पोर्टलवर अपलोड केली जात आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.