परळी तालुकाबीड जिल्हाराजकारण

ना. पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत रविवारी परळीत भाजपची ' विजयी संकल्प रॅली '

दहा हजार मोटरसायकल सह कार्यकर्ते होणार सहभागी

परळी दि. ०१ : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या रविवारी म्हणजे ३ तारखेला शहरात भाजपच्या वतीने 'विजयी संकल्प रॅली' काढण्यात येणार आहे. सुमारे दहा हजार मोटरसायकल सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅलीत सहभागी होणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारने जनहितासाठी केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी या उद्देशाने भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रदेश पातळीवरून विविध कार्यक्रम राबविण्याचे सूचित करण्यात आले आहे, त्याचाच एक भाग म्हणून येत्या ३ मार्च रोजी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ही 'विजयी संकल्प रॅली' भाजपच्या वतीने काढण्यात येणार आहे. परळी शहरात पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ४ वा. गोपीनाथ गडावरील लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेवून ही रॅली निघणार आहे. ही रॅली पुर्णपणे बाईक रॅली असून यात मतदारसंघातील दहा हजार मोटरसायकल सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी होणार आहेत.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    रॅलीच्या तयारीसाठी बैठक

    रॅलीच्या तयारीसाठी आज यशःश्री निवासस्थानी भाजपच्या कार्यकर्त्यांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून गोपीनाथ गड येथून निघणारी ही रॅली तळेगांव, टोकवाडी, डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुल, आर्यसमाज, राणी लक्ष्मीबाई टाॅवर, गणेशपार, अंबेवेस, तळ, पुन्हा टाॅवर, स्टेशन रोड, एक मिनार चौक, बस स्टँड, योगेश गार्डन, ना. पंकजाताई मुंडे यांचे कार्यालय, शिवाजी चौक, वडार काॅलनी मार्गे वैद्यनाथ मंदिर येथे रॅलीचा समारोप होणार आहे. या रॅलीत सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, महिला, युवती व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.