अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
कोरोना सारख्या साथीच्या रोगामुळे बचाव व्हावा या बाबत जनजागृती करून काही दिवसांपूर्वीच गरजू जनतेला मास्क,हॅण्डवॉश व सॅनिटायझरचे वाटप केल्यानंतर शनिवार,दिनांक 8 ऑगस्ट रोजी टायगर ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जोपासात तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाला जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.टाइगर ग्रुप अंबजोगाई यांच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील धायगुडा पिंपळा येथील जीवनआधार भक्तीप्रेम आश्रमाला एक ते दोन महीने पुरेल एवढ्या सर्वसमावेशक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले किराणा साहित्य देण्यात आले.टाइगर ग्रुपचे तानाजी भाऊ जाधव आणि भैय्यासाहेब बंडगर यांच्या मार्गदर्शनखाली हा उपक्रम शनिवार,दि.8 ऑगस्ट 2020 रोजी राबविण्यात आला.यापूर्वी ही टायगर ग्रुप मराठवाडा विभागाचे अध्यक्ष उमेश पोखरकर यांनी कोरोना साथीमुळे होणा-या संभाव्य धोक्यापासुन नागरिकांचा बचाव होण्याकरीता अंबाजोगाई शहरात प्रत्येकी 500 मास्क,हॅण्डवॉश आणि सॅनिटायझरचे वाटप केले आहे.सर्व जनतेस कोरोनाला घाबरू नका,जागरूक रहा,”कोरोना” पासून सावध रहा असे सांगून कोरोना प्रतिबंधासाठी शासनाने सुचविलेले सर्व प्रतिबंधात्मक उपाय अवलंबवावेत आणि स्वतःची व कुटुंबाच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी असे उमेश पोखरकर यांनी आवाहन केले.याप्रसंगी आयोजक संतोषभाऊ डागा,टायगर ग्रुप मराठवाडा विभागाचे अध्यक्ष उमेश पोखरकर,दिपक लामतुरे,स्वप्निल सोनवणे,महादेव मोरे,भिमाआण्णा कांबळे,अक्षय धारेकर,दिपक पवार,रूद्रा रूद्राक्ष,आदित्य देशमुख,कृष्णा नरसिंगे,तिरूपती राठोड यांच्यासह टायगर ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.