म.राज्याचे माजीमंत्री मा.बाळासाहेब जाधव व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मा.आ.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश
लातूर दि.२८ :आज शिरूर ताजबंद येथे चाकूर येथील वॉर्ड क्रमांक ५ व ६ मधील चाकूर नगर पंचायतीच्या मागील निवडणूकीतील भाजपचे उमेदवार हरीबा किशवे व शिवसेनेचे उमेदवार बाबुराव शेवाळे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्याचे माजीमंत्री मा.बाळासाहेब जाधव साहेब व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.बाबासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जाहीर प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेल जिल्हा कार्यध्यक्ष प्रा.हरीश चव्हाण सर, नगरसेवक इलिआस सय्यद, शहराध्यक्ष बिलाल पठाण,महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, तुकाराम पाटील नागठाणेकर, अनिलराव वाडकर,अंकुशराव बोंबदरे, मधुकर कांबळे,स्वामी महाराज, हरीश किशवे, हाके अभंग, हरिश किसवे, अभंग हाके, बालाजी शेवाळे, संतोष झुंजरे, शिवराज सोनटक्के, अशोक केराळे, नरसिंग माने, नरहरी पोतदार, सागर रत्नपारखे, मुकसूद सय्यद, शिवकुमार हुडगे, विशाल बैनाबेने, रोहीत हाके, पदमाकर हाके, सचिन आशिवकर, गौस शेख, अजय सगरयांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.