अंबाजोगाई (प्रतिनिधी) दि.०२ : मुंबई विद्यापीठास लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नांव द्यावे या प्रमुख मागणीसह इतर सहा मागण्यांचे निवेदन बहुजन रयत परिषदेने शनिवार,दि.२ मार्च रोजी उपजिल्हाधिकार्यांना दिले.
राज्याचे माजी पाणी पुरवठा व स्वच्छता मंञी व बहुजन रयत परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात बहुजन रयत परिषद प्रभावी कार्य करणारी संघटना म्हणून ओळखली जाते.बहुजन रयत परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष दिलीपराव लोंढे व जिल्हासचिव सुंदरराव जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी यांना शनिवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मुंबई विद्यापीठाला लोकशाही आण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, दलित समाजातील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व कर्ज माफ करण्यात यावे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ तात्काळ सुरू करण्यात यावे,मातंग समाजाला अ,ब,क,ड नुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे, मागासवर्गीय महामंडळांचे संपुर्ण कर्ज माफ करण्यात यावे,नाभिक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी तसेच मराठवाड्यात दुष्काळामुळे शेतकर्यांना जशी विकास योजना सुरू करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर दलित समजातील मजुरांसाठी शासकीय योजना सुरू करावी,तसेच मुद्रा लोन या कर्ज योजनेचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे याप्रमुख सहा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. निवेदनावर बहुजन रयत परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव लोंढे व जिल्हासचिव सुंदरराव जोगदंड,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष हरिष वाघमारे,बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष बळीराम जोगदंड, यशवंत जगताप, काशिनाथ जोगदंड, भारत जोगदंड,अमोल मिसाळ,विलास घोलप,शिवाजी जोगदंड, एस.एल.जोगदंड, सचिन जोगदंड, भागवत दळवी,मंचक बिडवे,दत्ता जोगदंड, सुनिल बिडवे, संदीप लोंढे,प्रकाश जोगदंड, शंकरराव लोंढे, अन्वरभाई,विशाल लोंढे आदींसहीत इतरांच्या स्वाक्षर्या आहेत.