अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

ग्रंथालय चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते अनंतराव चाटे यांचे दुःखद निधन

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― ग्रंथालय चळवळ,शिक्षण,राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव माणिकराव चाटे यांचे वयाच्या 66 व्या वर्षी बुधवार, दि.29 जानेवारी रोजी पहाटे दुःखद निधन झाले.

अनंतराव चाटे यांनी तालुक्यातील वरवटी येथे कै.रघुनाथराव मुंडे विश्‍वस्त मंडळ स्थापन करून वसंतराव नाईक विद्यालय सुरू केले. ग्रामिण भागातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली.24 वर्षांपासून ते रघुनाथराव मुंडे स्मृती सोहळा आयोजित करत होते.त्यात विद्यार्थ्यांना कलावंत व विचारवंत यांना बोलावून मार्गदर्शन घेत असत.अलीकडे त्यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीला पुरस्कार देणे सुरू केले होते.मराठवाडा सार्वजनिक ग्रंथालय संघाचे ते पदाधिकारी राहिले व बीडचे प्रदीर्घ काळ कार्यवाह होते.गेल्या काही महिन्यांपासुन ते आजारी होते. स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असताना बुधवार दि. 29 जानेवारी रोजी पहाटे त्यांचे निधन झाले.त्यांच्या पश्‍चात पत्नी,तीन मुले,दोन मुली,सहा बहिणी,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर मौजे वरवटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी मंत्री अ‍ॅड.पंडीतराव दौंड,अक्षय मुंदडा,कालिदास आपेट, अंकुशराव काळदाते,श्रीहरी मुंडे,शिवाजी सिरसाट,दगडु लोमटे,अथर्व लोहिया, प्रा.दादाराव धाकडे,नरहरी मंठेकर,सरपंच सुंदर दुप्ते यांच्यासह पंचक्रोषीतील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


Back to top button