बीड:आठवडा विशेष टीम―
दि. ०६/०८/२०२० रोजी कांग्रेस गवताची ऍलर्जी झाल्यामुळे श्री सखाराम श्रीहरी जगदाळे यांना सायंकाळी कोकाटे यांच्या खाजगी दवाखान्यात नेले. तेथे त्यांनी जिल्हा रूग्णालयातून कोव्हीड निगेटिव्ह रिपोर्ट आणा मी तुमच्या पेशंटला दाखल करतो असे सांगितले.
जिल्हा रुग्णालयात रूग्ण दाखल करायला, ३ घंटे लागले तर आक्सिजन खाजगी डॉ.अभिजित गिरे यांनी लावला : सोमीनाथ सखाराम जगदाळे( मयताचा मुलगा)
– आम्ही सायं.७ वा. जिल्हा रुग्णालय येथे पोहोचलो, अडमिट करावयाचे आहे महणालो तर त्यांनी गेट उघडलेच नाही. आणि परिचारिकेने डॉ. हजर नाहीत, असे सांगितले. रूग्णाला श्वास घ्यायला त्रास होत होता.त्यानंतर खाजगी डॉ.अभिजित गिरे यांनी आक्सिजन लावले. त्यानंतर परीचारीकेने इंजेक्शन व ४ गोळ्या दिल्या.मात्र सरकारी डॉ.आलेच नाहीत. दुस-या दिवशी सुद्धा सायंकाळी ४ वाजेपर्यंत डॉ.आलेच नाहीत.
बंकट सखाराम जगदाळे : रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी घेतलाच नाही, मेल्यानंतर स्वाब घेऊन निगेटिव्ह रिपोर्ट दिला
– दुस-या दिवशी कोणीही तपासणीसाठी अथवा स्वाब घेण्यासाठी आले नाहीत म्हणुन डॉ.देशमुख यांना तपासणी करण्याची विनंती केली परंतु त्यांनी तपासणीसाठी नाकारत, रिपोर्ट आल्यावर तपासणी करु, त्याशिवाय काहीच करणार नाही असे सांगितले. स्वाब तपासणीसाठी पाठवा म्हणल्यावर माझ्यावरच रागावले. ईकडे यायचं नाही,जागेवरच बसायचं म्हणाले. त्यांनी स्वाब घेतलाच नाही,त्यांचा त्रास वाढत गेला तरी कोणीही लक्ष दिले नाही.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी रास्ता रोको आंदोलन : डॉ.गणेश ढवळे
श्री सखाराम श्रीहरी जगदाळे यांच्या प्रमाणेच यापुर्वीही विद्युत पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला होता तर दुसरा आक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला,तर आष्टी येथील रूग्णाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सुविधे अभावी झाला होता.आणि त्याविरोधात त्यांच्या मुलाने लेखी तक्रार पोलीस अधीक्षक यांना केली होती.आरोग्य विभागाकडुन आलेल्या ३३ कोटी खरेदी मध्ये अपहार तसेच कोव्हीड जिल्हा रुग्णालयात अस्वच्छता आदिमुळे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे.जिल्हा रुग्णालयातील असुविधा, वाढते मृत्युचे प्रमाण यासह ईतर असुविधा विषयी वारंवार तक्रारी करूनही कारवाई न करणाच्या निषेधार्थ मयत सखाराम जगदाळे यांचे दोन्ही मुले नातेवाईकासह रास्ता रोको आंदोलन डॉ.गणेश ढवळें लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली करणार आहेत.
मुलगा सोमीनाथ सखाराम जगदाळे, बंकट सखाराम जगदाळे व भाऊ रमेश श्रीहरी जगदाळे आदिंची मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड गृहमंत्री, आयुक्त आरोग्य सेवा संचालनालय, यांना जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक बीड, डॉ.एकनाथ माले, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातुर यांच्यातर्फे लेखी तक्रार, करण्यात आली आहे.