पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या वतीने महास्वच्छता अभियान
अंबाजोगाई (प्रतिनिधी)दि.०३:डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण,रेवदंडा (ता.अलिबाग)
यांनी स्वच्छतेतून लोकजागर केला.शहर, परिसर स्वच्छते सोबतच मनाचीही स्वच्छता करा असा मौलिक संदेश दिला.हे अभियान पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषद अंबाजोगाई यांच्या वतीने रविवार, दि.3 मार्च रोजी राबविण्यात आले.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडा (ता.अलिबाग) यांच्या सौजन्याने व पद्मश्री डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, अंबाजोगाईकर व नगरपरिषद यांच्या वतीने आयोजित महास्वच्छता अभियानाची सकाळी 6.30 वाजता अप्पर पोलिस अधिक्षक अजित बो-हाडे व राजकिशोर मोदी यांच्या हस्ते उदघाटन करून श्री.छत्रपती शिवाजी महाराज चौक अंबाजोगाई येथून भव्य सुरूवात झाली.
यावेळी श्रीसदस्य यांच्या स्वागतासाठी चौक हा आकर्षक रांगोळ्यांनी सुशोभित करण्यात आला होता.ही स्वच्छता मोहिम स्वच्छ भारत अभियानाचे मा. राज्यपाल यांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.या अभियानासाठी सोलापुर,पंढरपुर, उस्मानाबाद व लातुर परिसरातून सुमारे 13 हजार श्रीसदस्य हे स्वच्छतेसाठी अंबाजोगाई शहरात आले होते.प्रतिष्ठाण तर्फे हातमोजे,झाडु,मास्क,खोरे,टोपले आदी आवश्यक साहित्य पुरविण्यात आले होते. अंबाजोगाई शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपला अमुल्य सहभाग नोंदवावा असे आवाहन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. अभियानाचा समारोप वेणूताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणावर झाला. याप्रसंगी आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे, माजी आ.पृथ्विराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अक्षय मुंदडा, मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप, विकास जामदार यांची समायोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सुञसंचालन शैलेष कंगळे व विनायक मुंजे यांनी केले तर प्रास्ताविक भोजने यांनी करून उपस्थितांचे आभार अॅड.सोपानराव शिंदे यांनी मानले. या अभियानात उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, अॅड.शरदआण्णा लोमटे, नगरसेवक अमोल लोमटे,मनोज लखेरा, महादेव आदमाने, सुनिल व्यवहारे, वाजेद खतीब, धम्मा सरवदे, बबनराव लोमटे, संतोष शिनगारे, संजय गंभिरे, सुरेश कराड, कमलाकर कोपले, डॉ.अतुल देशपांडे, अनंतराव लोमटे, हनुमंतराव तौर, अशोक मोदी,मिलींद बाबजे,दिनेश भराडीया, ताहेरभाई, बाला पाथरकर, शेख रहीमभाई, शेख अनिसभाई, शमिमोद्दीन काझी, शेख खलील, पालिकेचे सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, धनराज सोळंकी, प्रतापराव पवार, निलेश मुथा, एस.बी.सय्यद, मेजर प्रा.एस.पी. कुलकर्णी, शिवाजीराव खोगरे, पोलिस निरीक्षक सिध्दार्थ गाडे, पञकार अविनाश मुडेगावकर, दत्ताञय आंबेकर, दत्ताञय दमकोंडवार, दादासाहेब कसबे, अभिजीत गाठाळ, सुदर्शन रापतवार,प्रशांत बर्दापुरकर, शिवकुमार निर्मळे, रवी मठपती, प्रदीप तरकसे, रणजित डांगे, दिलीप आरसुळ, नागनाथ वारद,राहूल देशपांडे यांचे सहीत शहरातील मान्यवर नागरीक, महिला भगिनी आदींची उपस्थिती लाभली.यावेळी नगरपरिषदेने सन्मानपञ देवून डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या लोककार्याचा गौरव केला. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे लोककार्य..!
डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने गेल्या अनेक वर्षांत व्यापक स्वच्छता मोहिमा राबविल्या आहेत.दि.16 नोव्हेंबर 2014 च्या स्वच्छता अभियानाची नोंद ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झालेली आहे.प्रतिष्ठाणच्या सौजन्याने आजपर्यंत वृक्ष लागवड,संवर्धन, महाआरोग्य शिबीरे, अपंग व मुकबधीरांना साहित्य वाटप,श्रवण यंत्र वाटप, विद्यार्थ्यांना दप्तर वाटप,पाच हजारा पेक्षा जास्त विहिर व बोअरचे पुन:र्भरण, विहिर व तलावातील गाळ काढणे,जातीचे व इतर दाखले वाटप करणे, पाणपोई निर्मिती, बस थांबे निर्मिती इत्यादी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने गेल्या अनेक वर्षांत राबविले आहेत.
-
अंबाजोगाईत होणार डॉ.श्री.दादासाहेब धर्माधिकारी यांचा नागरी सन्मान..!
अंबाजोगाई शहर स्वच्छ करण्यासाठी डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या सौजन्याने व नगरपरिषद व समस्त अंबाजोगाईकर यांच्या सक्रिय सहभागाने रविवार,दि.3 मार्च रोजी भव्य स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले.यामुळे अंबाजोगाई शहरातील स्वच्छता होण्यासाठी हे अभियान उपयुक्त ठरले. स्वच्छतेच्या बाबतीत अंबाजोगाईकर कायम आग्रेसर आहेत.याकामी अंबाजोगाईकर नागरिक यांचे पालिकेस सतत सहकार्य मिळते.डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणने स्वच्छतेच्या कामी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद आहे. पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार प्रतिष्ठाणचे या अभियानासाठी सोलापुर,पंढरपुर, उस्मानाबाद व लातूर परिसरातून आलेल्या सर्व तेरा हजार श्रीसदस्य यांचे मी मनःपुर्वक आभार मानतो.दादासाहेबांना आंतरराष्ट्रिय पातळीवरील नोबेल पुरस्कार मिळावा.सर्व अंबाजोगाईकर पद्मश्री डॉ.श्री.दादासाहेब धर्माधिकारी यांचा नागरी सन्मान करणार आहोत.प्रतिष्ठानच्या सेवेची संधी मिळावी.―राजकिशोर मोदी (गटनेते तथा माजी नगराध्यक्ष)
स्वच्छता अभियानात यांचा सहभाग..!
या अभियानात अंबाजोगाईतील भारतीय जैन संघटना, वकिल संघ,पञकार व डॉक्टर बांधव,विविध स्वयंसेवी संस्था,शिक्षण संस्था,रोटरी क्लब, इनरव्हिल क्लब, बचतगट,योगेश्वरी शिक्षण संस्था,भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांचे एन.एस.एसचे स्वयंसेवक व एन.सी.सीचे छाञ, सामाजिक संघटना, अंबाजोगाई पिपल्स बँक,योगेश्वरी नागरी पतसंस्था,मानवलोक,
जयप्रभा ग्रामिण विकास मंडळ, मानवलोक,ज्येष्ठ नागरिक संघ,योगेश्वरी रोटरी,व्यापारी संघटना,
ग्राहक पंचायत यांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.हे अभियान सर्व शहरात प्रभावीपणे राबविण्यात आले.
कचरा संकलनासाठी योग्य नियोजन
महास्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणावर सुका व ओला कचरा संकलित करण्यात आला.जमा केलेला कचरा हा नगर परिषदेच्या व खासगी वाहनातुन उचलण्यात आला व तो एकञित संकलीत करून डंपींग ग्राउंड पर्यंत पोहोंचवला गेला.यासाठी नगरपरिषदेच्या वतीने 150 ट्रॅक्टर,जेसीबी, टिप्पर,पाण्याचे टँकर पुरविण्यात आले होते. अंबाजोगाईकर नागरिकांनी उत्स्फुर्तपणे या अभियानात सहभाग घेतला.