बीड दि.२१:आठवडा विशेष टीम― काल बुधवारी (दि.२०) रोजी पाठलिलेल्या संशयितांच्या स्वॅबपैकी प्रलंबित असलेल्या १३ जणांचे कोविड-१९ अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने बीड जिल्ह्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. आज आलेल्या अहवालात १२ कोरोनाग्रस्त माजलगाव तालुक्यातील असून १ जण धारूर तालुक्यातील आहे.
आजच्या कोविड-१९ चाचणी अहवालानुसार माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील ११, सुर्डी येथील एक आणि धारूर तालुक्यातील कुंडी येथील एकास कोरोनाची लागण झाल्याचे आज निष्पन्न झाले आहे. हे सर्वजण मुंबईहून बीड जिल्ह्यात आले होते.आजच्या अहवाला नुसार धारूर तालुक्यात आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोग्रस्तांची संख्येचा विचार केला असता माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातील हाॅटस्पाॅट केंद्र बनला आहे.
कोरोना कोव्हीड 19 – बीड जिल्हा अपडेट
दिनांक – 21/05/2020
विदेशातून आलेले – 124
होम क्वारंटाईन – 06
होम क्वांरटाईनमधून मुक्त – 118
—
परजिल्ह्यातून आलेले व होम क्वारंटाईन असलेले – 9399
इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन – 20
—
एकूण पाठविलेले स्वॅब – 719
एकूण निगेटिव्ह स्वॅब – 643
एकूण पॉझिटिव्ह स्वॅब – 37
आज पाठविलेले स्वॅब – 32
प्रलंबित रिपोर्ट – 32
Inconclusive sample_07
———
ऊसतोड मजूरांचे प्रवेश – 47136
कंटेन्मेंट झोन–
1) इटकुर ता गेवराई येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1275 घरामधील 4740 नागरिकांचा सर्वे 14 टीम मार्फत करण्यात आला आहे.
2) हिवरा ता माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 818 घरामधील 3397 नागरिकांचा सर्वे 7 टीम मार्फत करण्यात आला आहे.
3) पाटण सांगवी ता. आष्टी येथील कंटेन्मेंट झोन मध्ये05 गावांचा समावेश असून 1276 घरामधील 6271 नागरिकांचा सर्वे 13 टीम मार्फत करण्यात आला आहे.
4) कवडगावथडी ता. माजलगाव येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 07 गावांचा समावेश असून 1076 घरांमधील 5096 नागरिकांचा सर्वे 07 टीम मार्फत करण्यात आला आहे.
5)चंदन सावरगाव ता कैज येथील कंटनमेंट झोन मध्ये 04 गावांचा समावेश असून 1349 घरामधील 8730 नागरिकांचा सर्वे 04 टीम मार्फत करण्यात आला आहे.
6) केळगाव ता केज येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 05 गावाचा समावेश असून 1276 घरामधील 6835 नागरिकांचा सर्वे 05 टीम मार्फत करण्यात आला आहे.
7) मोमीनपुरा,बीड शहर,येथील कंटेन्मेंट झोनमध्ये 173 घरांमधील 1028 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत सर्वे करण्यात आला आहे
8)जयभवानी नगर ,बीड शहर 98 घरांमध्ये 455 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत सर्वे करण्यात आला आहे.
9) वडवणी शहर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 388 घरांमध्ये 2853 नागरिकांचा आरोग्य टीम मार्फत करण्यात आला आहे.
10) पाटोदा शहर येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 2710 घरांमध्ये 19700 नागरिकांचा सर्वे 30 टीम मार्फत करण्यात आला आहे.
11) वहाली येथील कंटेन्मेंट झोन मध्ये 05 गावांचा समावेश असून 804 घरामध्ये 3560 नागरिकांचा सर्वे 08 टीम मार्फत करण्यात आला आहे.