सोलापूर लोकसभा निवडणुकीत रंगत येऊ लागली आहे. एकेकाळी काॅग्रेसला सहज व सुकर असलेला मतदार संघ आता अवघड झाला आहे. काॅग्रेसचा उमेदवार मीच असे ठाम सांगणारे सुशीलकुमार शिंदे यांनी उमेदवारी बाबत घुमजाव करण्यास सुरुवात केली आहे.सुशीलकुमार शिंदे यांची विधाने संभ्रमात टाकणारी असली तरी शिंदे हेच उमेदवार असतील.२००४ लोकसभा निवङणूक नंतर अनेकजण शिंदे (काॅग्रेस नाही)पासून दुरावले गेले आहेत.यामुळे गोळा-बेरीज करणे आता अवघड झाले आहे.निवङणूक जरी लोकसभेची होत असली तरी नेते आपण विधानसभेला कसे उमेदवार असू व निवङूण येऊ यावरच चर्चा करताना दिसत आहे. वास्तविक पाहता २०१४ चा पराभव हा काॅग्रेसला मागे खेचणारा आहे.तब्बल दिडलाख मतांनी भाजप विजयी.हा लीङ मोठा असल्याने काॅग्रेसला विजयासाठी खुप मेहनत घ्यावी लागणार आहे?शिंदे वगळता काॅग्रेसला पर्याय नाहि?नेते व पदाधिकारी हवालदिल झालेत.मागील पाच वर्षातील घङामोङि पाहता निष्ठा व विश्वास हरवल्याचे दिसते?सहा विधानसभा मतदार संघात शहरमध्ये व अक्कलकोट वगळता काॅग्रेसला मरगळ दिसते.कार्यकर्त्याची टीम दिसत नाही. पक्षा पेक्षा नेत्याभोवतीच गर्दी दिसते.जेष्ठ व पक्षातील गटबाजी, हेवेदावे प्रकर्षाने दिसतात.अशातच भाजपा उमेदवार अद्याप स्पष्ट होताना दिसत नाही. वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे सोलापूरातुनच निवङणूक लढविणार असल्याचे निश्चित समजले जाते.यामुळे राजकिय गणित फार अवघड दिसत आहे.व्यक्तीकेंद्रित राजकारण उदयास येताना दिसत आहे.
― संजय रूपनर(विश्लेषक)
7588289533