क्राईमपाटोदा तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

अंमळनेरचे हरिभाऊ पोकळे यांचे अपघाती निधन

पाटोदा (प्रतिनिधी) दि.०३: सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वृध्दास पाठी मागून भरधाव वेगात येणार्‍या स्कॉर्पियो जीपने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात जागीच मृत्यु झाला आहे.
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील कापडाचे व्यापारी तथा शेतीनिष्ठ शेतकरी हरिभाऊ नामदेव पोकळे हे नेहमी प्रमाणे आपल्या सहकार्याबरोबर पहाटेच्या सुमारास व्यायामासाठी गेले होते. परत येत असताना त्यांच्या समवेत चांगदेव बेदरे आणि बाबासाहेब वाघ हे दोघे ही होते. दरम्यान अचानक पाठीमागच्या बाजुने स्कॉर्पियो क्रमांक एम.एच.१४ एफ. बी.९१०० गाडीने जोरादार धडक दिल्याने त्यांना फरफटत दुरवर फेकल्याने त्यांना शरिराला अनेक ठिकाणी मार बसल्याने जागेवरच मृत्यु झाला. घटना समजताच फौजदार गढवे, जमादार फुलेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. अंमळनेर प्रा.आ.केंद्रात वैद्यकीय अधिकारी खरमाटे, व कर्मचारी भोये, गाडे यांनी शवविच्छेदन केले.
या प्रकरणी स्कॉर्पियो चालक गजानन सावळेराम शितोळे रा.कासारभाई ता.मुळशी यांचे विरुद्ध अंमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ए.पी.आय.विशाखा धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार फुलेवाड हे करित आहेत.
हरिभाऊ पोकळे शांत आणि मितभाषी हुशार व्यक्तीमत्व म्हणून त्यांचे कडे पाहिले जात होते.वडीलांच्या काळापासून त्यांचा कापड व्यवसाय होतो , पुढे त्यांनी तो टिकून ठेवला होतो. त्यानी आठवडी बाजार ही अनेक दिवस केले होते. गरिब परिस्थिती त्यांना आपला संसार उभा करीत एक आदर्श कुटुंब निर्माण केले होते. त्यांना तीन मुले असुन तीन ही मुले कर्तबगार आहेत. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, भाऊ, तीन मुले, सुना, नातु असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अपघाती निधना बद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुपारी १२ वाजता त्यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, व्यापारी, पत्रकार, चेअरमन , राजकीय क्षेत्रातील मान्यवर, नातेवाईक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    व्यायामाला जाताना काळजी घ्यावी―ए.पी.आय.विशाखा धुळे

    बीड - अमळनेर - नगर हा मार्ग रहदारीचा असुन या मार्गाने अनेक जड वाहनांचा आणि चार चाकी, दुचाकी गाड्यांची कायम ये जा चालू असते, रात्रीच्या प्रवाशाने चालक कंटाळून गेलेला असतो, त्या मुळे सकाळ च्या प्रहरी त्यास डुलकी लागुन अपघात घडतात. सकाळी व्यायामला जाताना आडमार्गाने जावे, अथवा आपली काळजी घेऊन शतपावली करावीत असे आवाहन अंमळनेर पोलीस ठाण्याच्या ए.पी.आय.विशाखा धुळे यांनी केले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.