आपला देश सांस्कृतिक प्रधान देश आहे.वर्षभर विविध सण असतात.यात नविन सणांची भर पडली,”वाढदिवस “.निवङणूक कोणतेही लागो,कार्यकर्ता लागतो तो आपला वाढदिवस साजरा करायला.यातून साध्य काय करायचे हे त्याला ठाऊक च नसते?परंतू अनेकांना (मंङप,स्पीकर,बॅनर, आचारि,)यांना ऑफ सिजनला धंधा मिळतो. वास्तविक पाहता आपल्या आयुष्यातील उर्वरित आयुष्याची जाण करून देणारा दिवस असतो.
राजकिय कार्यकर्त्याचा वाढदिवस म्हणजे समाजात प्रतिष्ठा वाढावी,नेत्याला आपली ताकद दिसावी,कौतुक करून घ्यावे,पण अशा कार्यक्रमांना लक्षवेधी गर्दि असते, विशेष म्हणजे नेते पण उपस्थित राहतात याचे चिंतन नागरिकांनी करावे.
स्वतःचे पैसे देवून भला मोठा हार, बॅनर, फटाके, जाहिरात, शाल, फेटा, मंडप तसेच अनाथ/गोरगरिबांना मोफत फोटो काढण्याएवढे वाटप.सर्वात महत्वाचे सर्व पक्षीय नेत्यांना निमित्ताने निमंत्रण. निमंत्रक सर्व प्राधान्याने उपस्थित राहतात. सत्कारमुर्ती ला उपमा(थोर महापुरूषा पासून ते सामाजिक मंङळीसह विश्लेषण होते.)व्यासपीठावर गर्दी पाहून कार्यकर्ता खुष होतो.
जेव्हा मान सन्मान, प्रचार करायला फुकटचे व्यासपीठ, निवांत बसून राहण्यापेक्षा टाईमपास.मात्र अशा कार्यक्रमांना तीन आकडे मोजता येतील अशी गर्दिच होत नाही.सामाजिक काम करणा-या माणसाच्या कार्यक्रमाला ” सामान्य माणूस “नसतो.नेता पण निरिक्षण करतो.हा कार्यकर्ता लोकसभा/विधानसभा/नगरसेवक निवडणूकिच्या वेळीच वाढदिवस करत असतो.
वास्तविक पाहता अशा कार्यक्रमांना नेत्यांनी अजिबात येऊ नये.गट-तट,स्पर्धा, राजकिय संघर्ष,निर्माण होतात.नाहक चांगले संबध बिघङतात.यामुळे कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा.ज्या नेत्यांसाठी आपण करता,तो नेता ऐन निवङणूकित दुस-या पक्षात असतो.तो फक्त स्वार्थ साधत असतो आणि कार्यकर्त्याचे ध्येय पूर्ण होत नाही.अपवाद वगळता वाढदिवस साजरा(राजकिय) करणारा लोकप्रतिनिधी झालाय का?
यामुळे कार्यकर्ता कुणीही होण्यास तयार नाही, प्रत्येकाला नेता व्हायचे. सामाजिक विषयावर आंदोलन/चर्चा/सर्वसामान्य जनतेसाठि केलेल्या लक्षवेधी काम/गोरगरिबांना दिलेलं योगदान/ असेल तर अशांना सर्वसामान्य जनता लक्षात ठेवते.
खरतर कार्यकर्त्याच्या वाढदिवसाला लोकप्रतिनिधी भाषणातून सांगतो,जनतेसाठि राबणार नेतत्त्व, गरीबांची अस्था, बरच काहि? मग आपण काय करता?तसेच आपण निवङून दिलेले लोकप्रतिनिधी काम करत नाहीत, मग तुम्ही कसे करणार?तुम्हाला नेता, कसा नेता करेल? यामुळे असे कार्यक्रम सर्वसामान्य माणूस ” मनोरंजन” म्हणून पाहत असते
स्वतःचे पैसे देवून “वाढदिवस “राजकिय साजरा करणे म्हणजे स्वतःलाच स्वतः फसविण्याचा अभिनव उपक्रम.
―संजय रूपनर