परळी तालुकाबीड जिल्हामहाराष्ट्र राज्य

ना. पंकजाताई मुंडे, खा.डाॅ.प्रितमताई मुंडे यांनी घेतले प्रभू वैद्यनाथाचे दर्शन

महाशिवरात्री निमित्त परळीत शिवभक्तांची मांदियाळी

परळी दि. ०४ : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.

  WhatsApp वर बातम्या हव्यात ?


  बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आज दुपारी पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, खा. डाॅ. प्रीतमताई मुंडे, श्रीमती प्रज्ञाताई मुंडे यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन ज्योर्तिलिंगाचे दर्शन घेतले. बळीराजावर आलेले दुष्काळाचे संकट लवकर दूर कर अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. वैद्यनाथ देवल कमिटीचे सचिव राजेश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, अशोक भातांब्रेकर, प्रतिमा भातांब्रेकर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  सोमेश्वर पालखीचे दर्शन

  जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर देवस्थान समितीच्या वतीने जिरेवाडीहून वैद्यनाथाकडे निघालेल्या पालखीचे ना. पंकजाताई मुंडे यांनी यशःश्री निवासस्थाना जवळ स्वागत करून श्री सोमेश्वराचेही दर्शन घेतले. यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

  This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.