सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
माध्यमिक शाळांत परीक्षेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण करण्याचा मान निंबायती ता.सोयगाव येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाने करण्याचा निर्णय घेवून या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तालुक्यातील हा अभिनव उपक्रम निंबायती माध्यमिक शाळेने राबविला आहे.
निंबायती ता.सोयगाव येथील वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीत यशस्वी होऊन तालुक्यात गुणवत्ता यादीत आलेल्या अविनाश जाधव या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा निर्णय वसंतराव नाईक संस्थेने घेतला होता.या निर्णयाला चारही गावांनी मान्यता देवून या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्याच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा पार पाडला यावेळी मुख्याध्यापक यशवंत चौधरी,व्ही.के चौधरी,एस.पी पाटील,शेळके गजानन राठोड,ज्ञानेश्वर तेली आदींची यावेळी शाळेत उपस्थिती होती.
निर्णयाचे तालुक्यात कौतुक-
गुणवत्ता यादीत आलेल्या गरीब कुटुंबाच्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या या निर्णयाचे तालुकाभर कौतुक करण्यात येत असून निंबायती शाळेने हा अभिनव उपक्रम राबवून आदर्श घालून दिला आहे.