पाचोरा तालुका

पिंपळगाव हरे येथील बाहुला नदीवरील पुलाचे भूमिपूजन सोहळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले

पाचोरा (ज्ञानेश्वर धोंडू पाटील) :पिंपळगाव हरे ता.पाचोरा येथे आज बाहुला नदीवरील पुलाचे भूमिपूजन सोहळा मा.ना.गिरीश भाऊ महाजन जलसंपदा मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभहस्ते संपन्न झाले याप्रसंगी मा.खासदार नानासो ए.टी.पाटील, मधुभाऊ काटे जि. प.सदस्य जळगाव, सदाशिव आबा पाटील,बंनसीलाल पाटील सभापती प.स.पाचोरा,सतीष बापू शिंदे कृ.ऊ.बाजार समिती पाचोरा भडगाव, सुभाष पाटील तालुका अध्यक्ष भाजपा,नंदू बापू सोमवंशी शहर अध्यक्ष पाचोरा, अमोल दादा शिंदे,प्रदीप बापू सरचिटणीस,गणेश पाटील युवा मोर्च्या अध्यक्ष भाजपा पाचोरा,सौ. रत्नप्रभा अशोक पाटील प.स.सदस्य पाचोरा,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते
या वेळी मधुभाऊ काटे यांनी पिंपळगाव-शिंदाड जि.प.गटा मध्ये अनेक कोटी रुपयाची कामे मंजूर केली असून त्या प्रसंगी त्यांचा सत्कार मा.ना.गिरीश भाऊ महाजन यांनी केला यावेळी मा.खासदार ए.टी.पाटील यांनीही मधुभाऊ च्या कामा बद्दल गौरोदगार काढले याप्रसंगी पिंपळगाव हरे गोविंद महाराज मंदिरासाठी 3 कोटी 55 लक्ष रु पर्यटन विकास योजने मधून मंजूर झाले त्या कामाची माहिती देण्यात आली.या वेळी परिसरातील,जि. प.गटामधील भाजपा प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.या कार्यक्रमाचे डॉ.शांतीलाल तेली,विनोद महाजन,देविदास पाटील,वसंत गीते,अनिल महाजन,परेश पाटील,योगेश हटकर यांनी परिश्रम घेतले

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.