हल्ली गल्लोगल्ली पुरस्कारांचे जे उदंड पीक आलेले आहे, त्यामुळे प्रश्न पडतो की, या पुरस्कारांनी खरोखरच सर्वोत्तम कलाकृतींचाच सन्मान होतो का? हा प्रश्न पडावा अशीच सध्याची परिस्थिती आहे. याचे अनेक दाखले देता येतील.
पुरस्कारा देणे काहींचा व्यवसाय झाला आहे.
अनेक पुरस्कार हे कुणाला तरी खूश करण्यासाठी, त्यांची मर्जी संपादन करण्यासाठी किंवा त्यांना आपल्यात सामावून घेण्यासाठीच सुरू झाले आहेत की काय असे वाटते.
त्यांचा सरळसोट हिशोब असतो- आपल्याला मानणारा, भविष्यात आपल्या कामी येणारा आणि आपल्या फायद्याचा माणूस हा त्यांचा प्राधान्यक्रम असतो.
या बाजारू पुरस्कार संस्कृतीमुळे दिवसेंदिवस सामाजिक-सांस्कृतिक अनारोग्यात वाढ होत आहे.
वशिलेबाजी आणि चापलूसी करून पुरस्कार पदरात पाडणाऱ्यांनाही कोणते समाधान मिळते हे कळायला मार्ग नाही.
पुरस्कार हे कृतज्ञता व्यक्त करण्याचे नव्हे, तर कुरघोडीच्या राजकारणाचे साधन बनू पाहत आहे.
संजय रूपनर
7588289533