राष्ट्रीयशेतीविषयक

अमृतसर - जालंधर रेल्वे रुळावर शेतकऱ्यांचे आंदोलन

अमृतसर (वृत्तसंस्था) दि.०४ : सोमवारी आपल्या मागण्यासाठी शेतकऱ्यांनी जंडियाला जवळ अमृतसर-जालंधर रेल्वेरुळावर आंदोलन केले.दुपारी २ वाजता शेतकरी रेल्वेरुळावर येऊन बसले होते.संध्याकाळ होईपर्यंत आंदोलन चालूच होते.शेतकऱ्यांच्या या रेल्वेट्रॅक वरील आंदोलनामुळे सोमवारी ६ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    त्याआधी तेथील शेतकऱ्यांनी भारतीय किसान युनियन च्या अंतर्गत समितीने सोमवारी सकाळी तारण जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले होते.मागण्या मान्य न केल्याच्या कारणाने शेतकरी रेल्वे ट्रॅक वर येऊन बसले.आंदोलनकरी शेतकऱ्यांनी दावा केला आहे की दोन वर्षात राज्यात ९०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

    डॉ स्वामिनाथन आयोग अहवालाची अमलबजावणी केली जात नाही.जंगली जनावरांमुळे पिकाचे नुकसान होत आहे त्यावर सरकारने उपाययोजना कराव्यात.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.