अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हासामाजिक

‘मनोहर अंबानगरी’ शॉर्ट फिल्मचा प्रिमिअर शो ; नगरपरिषदेच्या ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन समितीचा पुढाकार

अंबाजोगाई पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सामुहिक प्रयत्न व्हावेत-प्रा.शरदराव हेबाळकर

सांस्कृतिक वारसा जतन करून कलात्मकता जोपासा -उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव

अंंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाईला वेळोवेळी सामाजिक, सांस्कृतीक क्षेत्राची उत्तम जाण असणारे नेतृत्व लाभले आहे. पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी सामुहिक प्रयत्न हवेत अंबाजोगाईला मोठा वारसा आहे.हा समृद्ध वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोंचला पाहिजे यासाठी सर्व मिळून कार्य करू असे आवाहन ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा.शरदराव हेबाळकर यांनी केले. तर अंबाजोगाईचा सांस्कृतीक ठेवा हा ‘मनोहर अंबानगरी’ द्वारे जगभर पोहोंचला आहे. जे-जे उन्नत ते जगाच्या पाठीवर मांडले पाहिजे. मनोहर अंबानगरी प्रमाणेच महाराष्ट्र व देश मनोहर कसा करता येईल यासाठी प्रयत्न व्हावेत कलात्मका जोपासण्याचे आवाहन उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    अंबाजोगाईच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख सर्वदूर व्हावी,या उद्देशाने गेल्या साडेचार वर्षांपासून ‘मनोहर अंबानगरी’ हा प्रकल्प सुरु आहे.‘मनोहर अंबानगरी’ वरती एक लघुपट (shortfilm) व माहितीपट तयार केला आहे.तो आता अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये गाजत आहे.या लघुपटाचा (शॉर्ट फिल्मचा) प्रिमिअर शो अंबाजोगाईकरांनी रविवार,दि.3 मार्च रोजी लोकनेते विलासराव देशमुख सभागृहात आयोजित कार्यक्रमात पाहिला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय इतिहास संकलन समितीचे अध्यक्ष प्रा.शरदराव हेबाळकर हे होते तर यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव,माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, मुख्याधिकारी, डॉ.सुधाकर जगताप, ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन समितीचे सचिव तथा नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,मनोहर अंबानगरी हा माहितीपट व लघुपट तयार करणारे राहुल नरवणे,प्रा.राधेश कुलकर्णी, मानसी खटी, रश्मी देव,आदीत्य धलवाड,अरूंधती कामठे,नगरसेविका संगीताताई काळे, नगरसेविका संगीताताई व्यवहारे,नगरसेविका सविताताई लोमटे, नगरसेविका कांचनताई हनुमंत तौर,संजय गंभीरे,सुनिल व्यवहारे आदी मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी दिपप्रज्वल व प्रतिमापुजन होवून समितीच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.यावेळी प्रास्ताविक करताना समितीचे सचिव नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे यांनी ’प्रिमीयर शो’च्या माध्यमातून मनोहर अंबानगरीचे दर्शन शहर वासीयांना व्हावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगुन समितीची निर्मिती, त्यासाठीचा ठराव व भविष्यात अंबाजोगाईचा ऐतिहासिक दस्तावेज संकलीत,जतन व संवर्धन करण्याचे काम समितीमार्फत करण्यात येईल अशी माहिती डॉ.देशपांडे यांनी दिली. तर यावेळी बोलताना राहुल नरवणे यांनी मनोहर अंबानगरी माहितीपट व लघुपट निर्मितीसाठी अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,अनिकेत लोहिया आदींसहीत कुटुंब, मित्र परिवार व स्नेहीजनांचे मोलाचे सहकार्य, पाठबल लाभल्याचे सांगितले.तर यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी गेल्या चार वर्षापासुन हा उपक्रम पुर्ण होत असल्याचे सांगुन अंबाजोगाईचा सांस्कृतीक वारसा जतन करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.पुढील काळात प्रोत्साहन व सहकार्य हे कायम राहील.शहराचा इतिहास नव्या पिढीसमोर आला पाहिजे. शॉर्टफिल्मच्या माध्यमातून अंबाजोगाईचे नांव जगभर गेले.शहर पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे, पर्यटनातून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत.या करिता पुर्वी शहरात ऐतिहासिक वास्तु संग्राहालय निर्माण करण्यात आले आहे. तर आता समितीचे गठन करण्यात आले असून या प्रकल्पासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे यावेळी मोदी यांनी जाहिर केले.या प्रसंगी राहूल नरवणे,प्रा.राधेश कुलकर्णी,अभिजीत जोंधळे यांची समायोचित भाषणे झाली. उपजिल्हाधिकारी शोभादेवी जाधव यांनी मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय समारोप प्रा.शरदराव हेबाळकर यांनी केला.उपस्थितांचे आभार मुख्याधिकारी डॉ.सुधाकर जगताप यांनी मानले.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दत्तप्रसाद गोस्वामी,मिरा गुळभिले यांनी केले. यावेळी सभागृहात डॉ.नरेंद्र काळे,शरयुताई हेबाळकर, अ‍ॅड.शरदअण्णा लोमटे, गणपत व्यास, डॉ.खेडगीकर,मुजीब काझी,बाबुराव बाभुळगावकर,दगडु लोमटे,यशवंत आरसुडे, पत्रकार प्रशांत बर्दापुरकर,डॉ.शुभदा लोहिया, प्रा.फुलतांबकर,संतोष मोहिते,पत्रकार रणजित डांगे,राहुल देशपांडे, अरूण गंगणे आदींसहीत मान्यवर व इतिहासप्रेमी नागरिक, संशोधक व अभ्यासक यांची उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगरपरिषदेच्या ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन समितीच्या अध्यक्ष तथा नगराध्यक्षा सौ.रचनाताई सुरेश मोदी,सचिव तथा नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,सदस्य तथा उपनगराध्यक्ष सारंग पुजारी,इतिहास संशोधक प्रा.शदरराव हेबाळकर,नगरसेवक अमोल लोमटे, नगरसेवक सुरेश कराड, नगरसेवक दिनेश भराडीया,प्रा.राधेश कुलकर्णी,जितेंद्र देशपांडे,आकाश क-हाड,नामदेव गुंडाळे, दत्तप्रसाद गोस्वामी, नगररचनाकार, अभिरक्षक पुरातत्व विभाग सल्लागार सदस्य तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी,नगरसेविका कांचनताई हनुमंत तौर,रत्नाकर निकम तसेच पालिकेचे लेखाधिकारी उदय दिक्षीत,रमेश सोनकांबळे व इतर कर्मचार्यांनी पुढाकार घेतला.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.