पाचोरा येथील झेरवाल अॕकेडमी चा स्तुत्य उपक्रम
पाचोरा दि.२९:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनजन्य परिस्थितीत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, नगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार, माजी सैनिक यांच्या पाल्यांची शैक्षणिक क्लासेसची जबादारी झेरवाल अॕकेडमी घेणार आहे. यासाठी पालकांनी झेरवाल अॕकेडमीशी संपर्क साधून आपल्या पाल्यांच्या नावाची नोंदणी करण्याचे आवाहन झेरवाल अॕकेडमीच्या वतीने करण्यात आले आहे.
झेरवाल अॕकेडमीच्या वतीने इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी शिकवणी दिली जाणार असून प्रत्येक बॅच मध्ये या पाल्यांना विशेष आरक्षण देण्यात आले आहे. तसेच इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना इंजिनियरिंग व मेडिकल साठीच्या घेतल्या जाणाऱ्या JEE व NEET या परीक्षांच्या तयारीसाठी सुद्धा सवलतीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व वर्गातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,वह्या, पुस्तके, पेन इत्यादिंची मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे. झेरवाल अकॅडमी च्या या स्तुत्य कार्यामुळे पाचोरा व भडगाव शहरातील असंख्य विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे संचालकांनी सांगितले. कोरोनाजन्य परिस्थितीत आरोग्य, पोलीस तसेच नगारपालिका महसूल विभागातील या कर्मचारी योद्ध्यांनी जीवाची बाजी लावून आपले काम प्रमाणिकते केले आहे.त्याबद्दल त्यांचे ऋण फेडले जाऊ शकत नाही मात्र अशा या योजनांमुळे आपण त्यांना मदत करू शकतो.असे मत झेरवाल अॕकेडमी च्या संचालकांनी व्यक्त केले आहे.यासोबतच 2020-21 या शैक्षणिक वर्षात अॕकेडमी मार्फत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात निपुण करण्याचे मानस असल्याचे संचालकांनी बोलून दाखवला आहे.
नाव नोंदणीचे आवाहन
कोरोना योद्धा म्हणून कार्यरत असलेल्या पालकांनी त्यांच्या कुटुंबातील इ.5 वी ते 12 वीत शिक्षण घेणा-या पाल्यांच्या क्लाससाठी लवकरात लवकर अॕकेडमीशी संपर्क करून आपल्या पाल्यांची नाव नोंदणी करावी. प्रत्येक वर्गात या विद्यार्थ्यांसाठी 35 टक्के कोठा आरक्षित ठेवण्यात आला आहे.
―संचालक
झेरवाल अकॅडमी