अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हा

बोरूळ तलाव स्मशानभूमी सार्वजनिक सभागृहासाठी 10 लक्ष आणि पोखरी ते सेलुअंबा रस्ता डांबरीकरण व सुधारणेसाठी 25 लक्ष रूपये मंजुर-नगरसेविका सौ.संगिता दिलीप काळे यांची माहिती

खा.डॉ.प्रितमताई मुंडे,आमदार प्रा.सौ. संगिताताई ठोंबरे यांनी दिला भरीव निधी

अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई शहरातील रविवार पेठ,बोरूळ तलाव स्मशानभूमी समोरील नगरपरिषदेच्या मालकी जागेवर सार्वजनिक सभागृह बांधण्यासाठी
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी खासदार फंडातून 10 लक्ष रूपये निधी तसेच पोखरी रोड ते सेलुअंबा रस्ता डांबरीकरण व सुधारणा करण्यासाठी आमदार फंडातून सुमारे 25 लक्ष रूपयांचा निधी केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे यांनी मंजुर केला आहे. याकामी सातत्याने पाठपुरावा करून हा निधी प्राप्त करून घेण्यासाठी केज मतदार संघाच्या आ.प्रा. सौ.संगीताताई ठोंबरे यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेतील गटनेत्या व नगरसेविका सौ.संगिताताई दिलीपराव काळे यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेतील गटनेत्या व नगरसेविका सौ.संगिताताई दिलीपराव काळे यांनी दिलेली माहिती अशी की,बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी त्यांच्या खासदार फंडातून अंबाजोगाईतील रविवार पेठ भागातील बोरूळ तलाव स्मशानभूमी सार्वजनिक सभागृहासाठी दहा लक्ष रूपयांचा निधी मंजुर केला आहे.निधी मंजुरीचे हे पत्र मुख्याधिकारी यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.तसेच केज मतदार संघाच्या आ.प्रा.सौ. संगिताताई ठोंबरे यांनी
आमदार फंडातून अंबाजोगाई शहरातून जाणारा पोखरी रोड ते सेलुअंबा रस्ता डांबरीकरणासह सुधारणा करण्यासाठी 24 लक्ष 98 हजार रूपये मंजुर करण्यात आले आहेत.मंजुरीचे हे पत्र जिल्हा नियोजन समिती,जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग,अंबाजोगाई यांना 13 फेब्रुवारी 2019 रोजी प्राप्त झाले आहे.सदरील निधी मिळवून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेतील गटनेत्या व नगरसेविका सौ.संगीताताई दिलीपराव काळे व माजी नगरसेवक दिलीपराव काळे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आ.प्रा.सौ. संगिताताई ठोंबरे यांनी याप्रश्नी विशेष लक्ष घालून व प्रयत्न करून जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्याकडून सदरील निधी मंजुर करून घेतला.त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नगरपालिकेतील गटनेत्या व नगरसेविका सौ.संगिताताई दिलीपराव काळे यांनी राज्याच्या मंत्री व पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे यांचे आभार मानले आहेत.निधी प्राप्त झाल्याबद्दल भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी,नगरसेवक सुरेशराव कराड, नगरसेवक डॉ.अतुल देशपांडे,नगरसेवक कमलाकर कोपले, नगरसेविका शिल्पाताई संजय गंभीरे, नगरसेविका सविताताई अनंतराव लोमटे, नगरसेविका कांचनताई हनुमंत तौर,कांतीलाल दादा केंद्रे,नारायणराव केंद्रे,शैलेश कुलकर्णी यांनी राज्याच्या मंत्री व पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे, खा.डॉ.प्रितमताई मुंडे, आ.प्रा.सौ.संगिताताई ठोंबरे यांचे आभार मानले आहेत.तसेच अंबाजोगाईतील मुकुंद कदम,अरूण कातळे, बालासाहेब तांबोळी, विष्णु कदम,अंगदराव हावळे,शत्रुघ्न बलुतकर, अनंतराव काळे,घुमरे गुरूजी,रघुनाथ काळे, भास्करराव भिसे,दादा शेंडगे,भागवतराव लाखे,अरूणराव कदम, सुरेश म्हैत्रजकर,बळी कदम,भारत कदम, कांता दोडके आदींनी सदरील निधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.,

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.