क्राईमनागपूर जिल्हामहाराष्ट्र राज्य

खुलताबादच्या डॉक्टरला एटीएस ने केली अटक

औरंगाबाद :इसिस (ISIS) या दहशतवाद पसरवण्याऱ्या संघटनेच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून दहशतवाद विरोधी पथकाने खुलताबाद येथील डॉक्टरला अटक केली आहे.इसिसच्या संपर्कात राहून घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून एटीएसने जानेवारी मध्ये मुंब्रा व औरंगाबाद येथून 9 संशयितांना अटक केली होती.सदर डॉक्टर त्यांंच्या संपर्कात होता.असा दहशतवाद विरोधी पथकाचा संशय असून, डॉ.मोनीश असे अटकेतील डॉक्टरचे नाव असल्याचे समजते.

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात इसिस(ISIS) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या काही तरुणांचा लग्न समारंभ अथवा अन्य गर्दी जमविणाऱ्या समारंभातील अन्न व पाण्यात विष कालवून घातपात करणार असल्याची माहिती एटीएसला मिळाली होती.यावरून त्यांनी मुंब्रा आणि औरंगाबाद येथे एकाचवेळी छापे मारले.या छाप्यात मुंब्रा येथून मझहर शेख , जम्मन खुठेउपाड , सलमान खान , फरहद अंसारी व एक अल्पवयीन तसेच औरंगाबाद येथून मोहम्मद सिराज उल्लाह खान , मोहम्मद लकी उल्लाह सिराज खान , काजी सर्फराज आणि मुशाहेद उल इस्माईल उर्फ तारेख अशा एकूण नऊ संशयितांना अटक करण्यात आली होती.ते सर्व सद्या न्यायालयीन कोठडीत आहेत.त्यांंची तपासात बारकाईने चौकशी केली असता,खुलताबाद येथील एक डॉक्टर त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली.यावरून डॉ.मोनीश यांना सोमवारी बोलावून दिवसभर कसून चौकशी केली.आज सकाळी त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रानुसार समजते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.