राष्ट्रीय

पुलवामा हल्ल्याला दुर्घटना म्हणणाऱ्या 'त्या' काँग्रेस नेत्याला माजी सेना प्रमुखांनी फटकारलं

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्दिजय सिंह यांनी एक वादग्रस्त ट्विट केलंय. दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना 'दुर्घटना' असा शब्द वापरलाय. तसंच त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरच्या बालाकोट भागात करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्नचिन्हही उपस्थित केल आहे. त्यावर माजी सेना प्रमुख आणि केंद्रीय मंत्री जनरल व्ही के सिंह यांनी दिग्विजय सिंह यांना चांगलंच फटकारलंय.

'पुलवामा दुर्घटनेनंतर आपल्या वायुसेनेन केलेल्या हवाई हल्ल्यावर परदेशी मीडियाकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे आपल्या भारत सरकारच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे' असं ट्विट दिग्दिवज सिंह यांनी केलं.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    यावर, दिग्विजय सिंह यांना प्रत्यूत्तर देताना जनरल (रिटायर्ड) व्ही के सिंह यांनी 'जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेला दहशतवादी हल्ला ही घटना दुर्घटना होती की हल्ला'... इथवरचं ते थांबले नाहीत तर त्यांनी 'राजीव गांधींची हत्या, दुर्घटना होती की दहशतवादी घटना? याचं उत्तर मला दिग्विजय सिंग यांनी द्यावं बाकीच्या गोष्टी नंतर बोलू' असं म्हणत दिग्विजय सिंह यांना अडचणीत आणले आहे.

    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.