अंबाजोगाई तालुकाखेळबीड जिल्हा

राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सुबोध देवरेने पारीतोषिक पटकावले

अंबाजोगाई (प्रतिनिधी) : येथील सुबोध राजरत्न देवरे या विद्यार्थ्याने नुकत्याच बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तृतीय पारितोषीक पटकावले त्याबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.
अंबाजोगाईतील खोलेश्वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता 5 वी वर्गात शिकणार्‍या सुबोध राजरत्न देवरे या विद्यार्थ्याने बीड येथे चंपावती क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होत उज्वल यश संपादन केले.या स्पर्धेत सुबोधने तृतीय क्रमांक पटकावला आहे.बॅडमिंटन खेळातील सातत्यपुर्ण कामगिरीसाठी त्याला क्रिडा प्रशिक्षक कैलास शेटे यांचे मार्गदर्शन व वडील प्रा.राजरत्न देवरे यांचे प्रोत्साहन लाभले आहे.बीड येथे चंपावती क्रिडा मंडळाचे सचिव बळीराम गवते,घुगे सर व श्री.सुरवसे आदींसहीत मान्यवरांच्या उपस्थित सन्मानचिन्ह व रोख रक्कमेचे पारितोषिक सुबोधला देण्यात आले.
सुबोध हा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील ‘पाली' हा विषय शिकविणारे प्रा.राजरत्न देवरे यांचा मुलगा असून तो अभ्यासात हुशार आहे.अभ्यासासोबतच क्रिकेट व बॅडमिंटन आदी खेळात त्याने प्राविण्य मिळविले आहे. त्याच्या या यशाबद्दल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वनमाला रेड्डी यांनी सुबोधचे पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देवून तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय मुंदडा, सौ.नमिताताई मुंदडा,
यांनीही सुबोधचे पुष्पगुच्छ देवून कौतुक केले.यावेळी नगरसेवक संतोष शिनगारे, नगरसेवक दिनेश भराडीया,उपप्राचार्य प्रा.कांतराव गाडे, उपप्राचार्य डॉ.दिनकर तांदळे,उपप्राचार्य प्रा. भगवानराव शिंदे, डॉ.मुकूंद राजपंखे,श्री डांगे,डॉ.विठ्ठल केदारी, प्रा.पी.के.जाधव, प्रा.टी.एन.चव्हाण, प्रा.शैलेश जाधव, प्रा.आर.बी.भगत, प्रा.पाटील,प्रा.तत्तापुरे, प्रा.संजय जाधव, डॉ.रूपेश देशमुख, डॉ.विलास सोमवंशी, अधिक्षक लक्ष्मण वाघमारे,पत्रकार दत्ताञय दमकोंडवार,
पत्रकार रणजित डांगे आदींनी सुबोध देवरे याचे अभिनंदन केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.