पाटोदा (शेख महेशर) दि.०५ :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लीगल सेल च्या प्रदेश उपाध्यक्षपदी अॅड. नरसिंह जाधव यांची नियुक्ति करण्यात आल्याचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे राज्य अध्यक्ष अॅड. आशिष देशमुख यांनी दिले आहे. व त्यांच्या कडे मराठवाडा विभागाची विशेष जबाबदारी ही देण्यात आली आहे.अॅड.अशिष देशमुख यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद केले आहे की, दि.०४/०३/२०१९ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी व मजबुत करण्या साठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे आणि पक्ष अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार मराठवाड्यातील वकील बंधु,भगिनी व सर्व सामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी काम करावे असे आदेश दिले आहेत.
अॅड.जाधव हे पाटोदा येथील रहिवासी असून सध्या ते औरंगाबाद येथे हायकोर्टात वकीली करत आहेत. नरसिंह जाधव यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
अॅड.नरसिंह जाधव यांचे वडील स्व.अॅड.लक्ष्मणराव जाधव हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते.
0