खेळपाटोदा तालुकाबीड जिल्हा

पाचंग्रीच्या अमोल मुंढे ने ग्रीकोरोमन कुस्ती स्पर्धेत मिळवले ब्राँझपदक

पाटोदा ( प्रतिनिधी ) : पाटोदा तालुक्यातील पाचंग्री गावचा अमोल बाजीराव मुंढे यांनी राज्यस्तरीय ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत ८२ किलो वजन गटात मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत ब्राँझपदक मिळून गावाचे नाव राज्यात गाजवले आहे. सुरवातीच्या काळा मध्ये पाटोदा येथील जय हनुमान तालीम येथे बाळासाहेब आवारे वस्ताद यांच्या मार्गदर्शना खाली सरावाला सुरुवात केली. व सध्या पुणे येथे सराव करीत आहे .२४/०२/२०१९ रोजी पुणे महापौर कुस्ती स्पर्धेत ८६ किलो वजन गटात पहिला क्रमांक मिळवला आहे. व परभणी केसरी स्पर्धेत ८६ किलो वजन गटात पहिला क्रमांक मिळवून २५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना देखील त्याचे वडील बाजीराव मुंढे यांनी त्याला कुस्ती क्षेत्रात पाठवले व त्यांने देखील वडिलांच्या स्वप्नाचे चीज केले आहे .या कामगिरी बद्दल जय हनुमान तालीम पाटोदा चे डी.वाय.एस.पी. पैलवान राहुल आवारे, गोकुळ आवारे, प्रविण सोंडगे अध्यक्ष, सागर वाघ, सचिन दाताळ, राहुल दाताळ, आदिक दाताळ, सागर सुरवसे, विशाल सुरवसे, नागेश चोरगे ,अंबादास घटक, अंकुश गटकळ, आंधळे लहू , कृष्णा भराटे, ज्योतीराम जगदाळे ,सचिन शिंदे, पञकार दत्ता देशमाने इत्यादींनी पैलवान अमोल मुंढे त्यांचे अभिनंदन केले आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.