राफेल कराराची कागदपत्रे गहाळ, महाधिवक्ते के.के वेणूगोपाल यांची सुप्रीम कोर्टात खळबळजनक माहिती

नवी दिल्ली दि.०६: देशात चर्चेत असलेल्या राफेल लढाऊ विमान व्यवहारप्रकरणाची महत्त्वाची कागदपत्र गहाळ झाली आहेत.संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे.

राफेल विमान प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. यावेळी महाधिवक्त्यांनी याबाबतची धक्कादायक माहिती दिली.महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे.

‘संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्र समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे. हे एक अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे,’ असं के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे.

“देशाच्या सुरक्षेशी संबंधित हे प्रकरण आहे. दैनिक द हिंदू आणि याचिकाकर्ते प्रशांत भूषण आणि अन्य लोक चोरीच्या दस्तऐवजांवरुन माहिती लीक करत आहेत.आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत” असही यावेळी सरकारच्या वतीने महाधिवक्ते के के वेणूगोपाल म्हणाले.

राफेल विमान व्यवहारप्रकरणी दोन पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. पहिली पुनर्विचार याचिका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि अॅड प्रशांत भूषण यांची, तर दुसरी याचिका ‘आप’चे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी दाखल केली आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.