गोमळवाडा परिसरात प्रशासनाकडुन पिकांचे पंचनामे
शिरूर कासार दि.०१:आठवडा विशेष टीम― परतीच्या पावसामुळे खरीपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले असुन गोमळवाडा परिसरातील पिकांचे प्रशासनाच्या वतीने पंचनामे करण्यात आले असुन पिकांचे १००% नुकसान झाले असुन विमा कंपणीने तात्काळ पिकविमा मंजुर करावा आणि शासनानेसुद्धा शेतकऱ्यांना विनाअट सरसकट मदत करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी केली आहे.
एकतर अनेक वर्षांचा दुष्काळ,नापीकी यामुळे शेतकरी पुर्ण हैराण असुन परतीच्या पावसामुळे खरीपाच्या सर्वच पिकांचे १००% नुकसान झाले आहे.दि.०१/११/२०१९ रोजी गोमळवाडा परिसरातील पिकांचे प्रशासनाच्या वतीने थेट बांधावर जाऊन पंचनामे करण्यात आले.पिकांचे पुर्णच नुकसान झालेले असल्यामुळे विमा कंपणीने तात्काळ पिकविमा मंजुर करावा आणि शासनानेसुदधा शेतकऱ्यांना विनाअट सरसकट पिकअनुदानाची मदत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांनी केली आहे.यावेळी प्रगतशील शेतकरी एकनाथ पवार,सरपंच सुदाम काकडे,तलाठी पाखरेकाका,कृषीसहाय्यक लाडसाहेब,हारीभाऊ काकडे,लहु बनकर,संदीपान कातखडे,सुदाम शिंदे,आनिल सरवदे ,तुकाराम पाटोळे,बंडू पवार,हानुमान सरवदे आदीं शेतकरी बांधव उपस्थित होते.