औरंगाबाद जिल्हाराजकारण

१० मार्चला लोकसभा निवडणुकीबाबत शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची औरंगाबादेत बैठक

औरंगाबाद(प्रतिनिधी)-भारतावरिल शेतकरी आत्महत्तेचा कलंक पुसण्याकरिता आगामी लोकसभा निवडणुकीत सशक्त राजकीय पर्याय देण्यासाठी रघुनाथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 10 मार्च 2019,रविवार,सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत नंदलाल धूत हॉस्पीटलच्या मागे, उत्तर नगरी,औरंगाबाद येथे होणार आहे अशी माहिती शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अॅड.अजित काळे यांनी दिली.
बैठकीला शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीनाना नांदखिले,महिला आघाडी प्रमुख विमलताई आकणगिरे,आम आदमी पार्टीचे संयोजक ब्रिगेडिअर सुधिर सावंत, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले,कष्टकरी शेतकरी संघाचे राजू बावके,बळीराजा शेतकरी संघाचे गणेशकाका जगताप, लोकशाहीवादी कम्युनिस्ट पार्टीचे राजेंद्र परांजपे,कुरेशी संघटनेचे प्रांताध्यक्ष सादिक कुरेशी निमंत्रित असून शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख,जिल्हाप्रमुख,तालुकाप्रमुख,
महिला व युवाआघाडीचे प्रमुख तसेच क्रांतिसिंह नाना पाटील आघाडीच्या पदाधिका-यांसह प्रमुख कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे.
नेहरूपासून नरेंद्र मोदीपर्यंत गेल्या 72 वर्षात भारतात सुमारे चार लाखाहून अधिक
शेतक-यांनी आत्महत्या करून बलिदान दिले.तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रात सुमारे 80 हजार शेतक-यांनी आत्महत्त्या केल्या तरिही उद्योगपतींना स्वस्त शेतीमाल आणि मजूर पुरविण्याचे धोरण बदलत नाही.सन 1947 पासून सर्वाधिक काळ कॉग्रेस सत्तेत होती. चार वेळा बिगर कॉग्रेसी सरकारे आली.मात्र निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना उद्योगपतीचं पैसे पुरवित असल्याने शेतकरी विरोधी कायदे करुन शेतीची लूट सुरू आहे. सामाजिक न्यायाच्या नावाखाली राजकीय पक्ष धुडगूस घालीत आहेत. याविषयी बैठकीत चर्चा होईल.आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहिर करण्यात येईल असेही अॅड.अजित काळे यांनी स्षष्ट केले.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.