तुळजापूर (प्रतिनिधी): तुळजापूर तालुक्यातील मोजे मंगरूळ येथे महाशिवरात्री निमित्ताने भव्य पशुप्रर्दशनाचे आयोजन करण्यात आले होते , या प्रदर्शनामध्ये गावातील व परिसरातील अनेक पशु पाल्यांनी आपली जनावरे व पशु घेऊन आले होते. आणि या पशुप्रर्दशनास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या पशुप्रर्दशनामध्ये निवडक उत्कृष्ट जनावरांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी बोलताना श्री. महेंद्र काका धुरगुडे यांनी पशुप्रर्दशनात निवडलेल्या उत्कृष्ट जनावरांचे व त्यांचे पालन करणाऱ्या पालकांचे कौतुक करुन , पुढील वर्षी देखील जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य चित्तरंजन सरडे , सरपंच सत्तार मुलानी , उपसरपंच प्रतापसिंह सरडे , कमलाकर पाटील , किसन (आप्पा) डोंगरे , रेणणसिद्ध वाले , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सादगिरे साहेब , सुधाकर उपासे , प्रकाश उपासे , सौदागर जाधव , राजकुमार दुलंगे , महादेव नाना घोपडे , अजिंक्य सरडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.