बीड: कोरोना बाधित रुग्णांच्या तपासणीसाठी 24 तास तपासणी स्वॅब कलेक्शन – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. ४: कोरोना रुग्णांचा तपासणीसाठी 24 तास स्वॅब कलेक्शन आणि रुग्णांबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रतिसाद देणारे पथक कार्यान्वित करण्यात येत असून खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी संशयित कोरोना रुग्णांची पुढील तपासणी होण्यासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात कळवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात श्री. रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक झाली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला जागतिक आरोग्य संघटना (WHO) चे अधिकारी डॉ. अमोल गायकवाड , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना(आय एम ए )चे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. रेखावार म्हणाले, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना अमलात आणल्या जात आहेत कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना मानसिक आधार मिळावा यासाठी दूरध्वनीद्वारे आणि व्हिडिओ कॉलद्वारे नातेवाईकांशी संवाद साधण्याची फोन सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे. रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्यानंतर संसर्ग सुरक्षेच्या कारणामुळे नातेवाईकांना त्याचा थेट संपर्कात येता ठेवता येत नाही अशा स्थितीत डॉक्टर आणि परिचारिका हेच रुग्णाचे नातेवाईक आहेत, असे ते म्हणाले.

याच बरोबर बैठकीत कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने राज्यस्तरावरून समुपदेशन केंद्र स्थापित करून संबंधितास आवश्यक ती माहिती समुपदेशनाद्वारे दिली जात आहे. याच पद्धतीने बीड जिल्ह्यात देखील कार्यवाही सुरू असून याचा उपयोग वैद्यकीय व्यावसायिक आणि कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना देखील होत आहे. यासह विविध माहिती देण्यात आले.

डब्ल्यू एच ओ चे अधिकारी डॉ गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले कोरोना प्रादुर्भावाचा काळात देखील बालकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम आवश्यक ती काळजी घेऊन शासनाकडून सुरू ठेवण्यात आलेला आहे वैद्यकीय व्यावसायिकांनी देखील बालकांचे लसीकरण वेळापत्रकानुसार होईल याची काळजी घ्यावी यामुळे त्यांच्यामधील रोगप्रतिकारशक्तीचा विकास होईल आणि कोरोना संसर्गाच्या काळात त्यांचा साथीच्या आजारात पासून बचाव होईल.

यावेळी वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना( आय एम ए )च्या प्रतिनिधींना डब्ल्यू एच ओ च्या वतीने तयार करण्यात आला आलेली लसीकरण कार्यक्रमाबाबत ची विशेष माहिती पुस्तिका जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते देण्यात आली.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.