सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― मुदत संपणाऱ्या चाळीस ग्रामपंचायातींवर प्रशासक बसविण्याच्या हालचालींना सोयगाव तालुक्यात गती आली असून मात्र सहा ग्रामपंचायतींचे सरपंच कायम राहणार आहे.
सोयगाव तालुक्यातील चाळीस ग्रामपंचायतींची मुदत दि.१३ सप्टेंबरला संपणार आहे.त्यासाठी प्रशासक नेमण्याच्या हालचालींना गती आली असून मात्र २१ आक्टोंबर २०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या सहा ग्रामपंचायातींवर सरपंच राज कायम राहणार आहे.त्यामुळे चाळीस ग्रामपंचायातींवर प्रशासक आणि सहा ग्रामपंचायातींवर सरपंच अशी स्थिती सोयगाव तालुक्यात राहणार आहे.नुकत्याच निवडणुका झालेल्या ४६ पैकी सहा ग्रामपंचायती प्रशासकाच्या कचाट्यातून सुटका झाली असून या ग्रामपंचायतींचा गावगाडा सरपंच यांच्याच हाती कायम आहे.उर्वरित चाळीस ग्रामपंचायतींच्या प्रशासकाच्या प्रतीक्षेत आहे.
चौकट-स्वाक्षरीविना याद्या रखडल्या-
सोयगाव तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतींच्या प्रशासकाच्या याद्या तयार झालेल्या असून या याद्यांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी स्वाक्षरीविना याद्या जाहीर झालेल्या नाही.या व्यतिरिक्त सहा ग्रामपंचायतींची मुदत २०२२ मध्ये संपणार असल्याने या ग्रामपंचायतींच्या कारभार मात्र ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या हातात कायम झाला आहे.
प्रशासक नसलेल्या ग्रामपंचायती खालीलप्रमाणे——
नुकत्याच निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक बसविण्यात येत नसल्याने या ग्रामपंचायतींचा कारभार कायम सरपंच यांचेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
१)वनगाव-घोरकुंड
२)वरखेडी-ठाणा
३)कंकराळा-रावेरी
४)सावरखेडा-लेनापूर
५)वाडी-सुतांडा-नायगाव
६)माळेगाव-पिंपरी