अंबाजोगाई (प्रतिनिधी): इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा डिस्ट्रीक चेअरमन रेणुजी गुप्ता यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी रेणुजी गुप्ता यांनी इनरव्हील क्लबच्या कार्याचा आढावा घेवून क्लबच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली.
अंबाजोगाई इनरव्हील क्लबच्या वतीने जागतीक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रीक चेअरमन रेणुजी गुप्ता तर यावेळी तर विचारमंचावर सत्कारमुर्ती प्रा.संध्या ठाकरे,अनिता कांबळे, निर्गुणा कसपटे, इनरव्हीलच्या अध्यक्षा सोनाली कर्नावट,गिता परदेशी,अनिता फड, रंजना कराड,सुरेखा सिरसाट,शिवकन्या साळुंके,मिना डागा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी दिपप्रज्वलन व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.कोमल कात्रेला, मिना डाग यांनी स्वागतगीत सादर केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक इनरव्हीलच्या अध्यक्षा सोनाली कर्नावट यांनी केले.यावेळी इनरव्हील क्लबला डिस्ट्रीक चेअरमन रेणुजी गुप्ता यांच्या हस्ते प्रा.संध्या ठाकरे,अनिता कांबळे, निर्गुना कसपटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.याप्रसंगी इरनव्हील क्लब अंबाजोगाईच्या सदस्या असणार्या महिलांचा त्यांनी त्यांच्या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल वर्षभरात जे विविध पुरस्कार सन्मान त्यांना मिळाले. त्याबद्दल इनरव्हील क्लबने सदस्या सुरेखा सिरसट,सुवर्णा बुरांडे, शिवकन्या पवार, रेखाताई शितोळे,किरण देशमुख,जयश्री लोढा यांचाही सन्मान केला.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते इनरव्हीलच्या वतीने संपादीत वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी बोलताना इनरव्हील क्लबला डिस्ट्रीक चेअरमन रेणुजी गुप्ता म्हणाल्या की,माणूस चुकत असतो.परंतु,तो सरावाने सुधारतो.पुढे याच कामातून त्याची ओळख होते.जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सामाजिक कार्य करत राहणार,दिवाळी, वाढदिवस आदी उपक्रमांवरील अनावश्यक खर्च टाळून ते पैसे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी द्या, अंबाजोगाईचा इनरव्हील ग्रुप हा अतिशय चांगले कार्य करीत आहे.तो वर्षभर विविध विधायक उपक्रम राबवितो. त्यांच्यापासुन समाजाला प्रेरणा मिळते. समाजाला ऊर्जा देण्याचे काम इनरव्हील क्लब अंबाजोगाई करीत असल्याचे गौरवोद्गार इनरव्हील क्लबला डिस्ट्रीक चेअरमन रेणुजी गुप्ता यांनी काढले.यावेळी अनिता कांबळे,प्रा.संध्या ठाकरे यांनी सत्काराला उत्तर दिले.तर निर्गुणा कसपटे यांच्या सुनबाई आश्विनी कसपटे आपल्या सासुबद्दल गौरोवोद्गार काढून त्यांचा सन्मान झाला.यामुळे संपुर्ण कुटुंबियांचा हा बहुमान असल्याचे त्या म्हणाल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता कात्रेला यांनी करून उपस्थितांचे आभार शिवकन्या साळुंके यांनी मानले.कार्यक्रमाला इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.