बीड जिल्हा

जागतीक महिला दिनानिमित्त बीडमध्ये मतदार जनजागृती रॅली संपन्न

बीड,दि.८: भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांच्यावतीने जागतीक महिला दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, नायब तहसीलदार श्रीमती कमल कुटे, अव्वल कारकुन अर्चना गवळी, श्रीमती बेबीसरोज अंबिलवादे, प्रतिभा खाडे, एस.एम.जावळे, मुख्यमंत्री फेलो सायली काकडे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवाजी चौक व परत जिल्हाधिकारी कार्यालय येथे येवून रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा व नर्सीग कॉलेजच्या विद्यार्थीनींचा सहभाग होता. यावेळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, संबंधित शाळेचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button