अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अखिल भारतीय काँग्रेस व प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबीरात 200 जण झुम अॅपच्या माध्यमातून सहभागी झाले अशी माहीती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले आहे.
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवार,दि.14 सप्टेंबर 2020 रोजी ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी तथा मराठवाड्याचे प्रभारी माजी आमदार संपतकुमार,राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख,आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा बीड जिल्हा प्रभारी प्रा.सत्संग मुंडे,प्रदेश प्रशिक्षण कार्यक्रम राज्यप्रमुख तथा प्रदेश काँग्रेसचे सचिव अमर खानापुरे,प्रशिक्षण कार्यक्रम मराठवाडा समन्वयक असिफ मुल्ला,निमंत्रक तथा बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी हे मान्यवर नेते झुम अॅपच्या माध्यमातून सहभागी होवून त्यांनी मार्गदर्शन केले.या शिबिरात कोरोना (कोवीड 19) कसा निर्माण झाला.?हा विषाणू देशभर कसा पसरला.डिसेंबर- 2019 मध्ये काँग्रेस नेते खा.राहुलजी गांधी यांनी सांगितले होते की,कोरोनाचा फैलाव भारतात मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.त्यासाठी बाहेर देशातून येणा-या विमानांची सेवा तात्काळ बंद करा.मात्र केंद्र सरकारने हे केले नाही.मार्च महिन्यामध्ये गरज नसताना लॉकडाऊन करण्यात आले.त्यामुळे परप्रांतियांना त्यांच्या राज्यात जाता आले नाही.तेअडकून पडले त्यांना पाठवणे गरजेचे होते.त्यांना सूचना देणे गरजेचे होते.ते केले नाही.आता लोकांच्या हाताला काम नाही, खायला अन्न नाही.तेव्हा लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे.त्यामुळे देशात रूग्ण वाढून भारत हा कोरोना संक्रमणाच्या बाबतीत जगात दुस-या क्रमांकावर पोहोचला आहे.त्यामुळे कोरोना हाताळण्यात केंद्र सरकार हे सपशेल अपयशी ठरले,चीन ने आपला भूभाग बळकावला आदी मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी हे अतिशय चांगले काम करीत आहेत.राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारणी त्यांना सर्वोतोपरी ताकद येईल असे ही यावेळी सांगण्यात आले.अतिशय चांगल्या पद्धतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले.मराठवाड्यात हे पाचवे शिबिर असताना सर्वांत जास्त प्रतिसाद बीड येथील प्रशिक्षण शिबिराला मिळाला.या शिबिरात जिल्हा सचिव अॅड.विष्णुपंत सोळुंके,शहराध्यक्ष तथा नगरसेवक महादेव आदमाने, वशिष्ठ बडे,चरणसिंह ठाकूर यांनी चर्चेत सहभाग नोंदवला तर डॉ.राजेश इंगोले यांनी सूत्रसंचालन केले.शिबिराच्या यशस्वितेसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे बीड जिल्हा समन्वयक यांनी पुढाकार घेतला.
200 कार्यकर्ते सहभागी
=================
ऑनलाईन प्रशिक्षण शिबीरात बीड जिल्हा काँग्रेस,महिला काँग्रेस,युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, अनुसूचित जाती सेल, अल्पसंख्यांक सेल,ओ.बी.सी.सेल,एनएसयुआय,सोशल मिडिया आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे सन्मानिय नेते,जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचेसह 200 जण झुम अॅपच्या माध्यमातून सहभागी झाले.शिबिरात मान्यवर नेत्यांनी संवाद साधत मार्गदर्शन केले.
कोरोना संकटकाळात जिल्हा काँग्रेसचे उपक्रम
=================
बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कोरोना संकटकाळात गरजूंना मदत करून 8 हजार कुटुंबांना अन्नधान्याचे कीट,मास्क,हँडग्लोव्हज,सॅनिटायझर वाटप करण्यात आले.बीड जिल्ह्यात व्यवसायाच्या निमित्ताने आलेले परराज्यातील 700 लोकांना त्यांचे मुळगावी पाठवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.स्वा.रा.ती.रूग्णालयात रक्तदानाचा तुटवडा निर्माण झाल्याने 600 च्या जवळपास कार्यकर्ते यांनी रक्तदान केले.वृक्षारोपण करण्यात आले.अशी माहिती बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिली.
अभिनंदनाचा ठराव पारीत
=================
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र प्रभारी म्हणून खा.एच.के.पाटील,सल्लागार मंडळातील समावेशाबद्दल मुकूलजी वासनिक,राजीव सातव तसेच जम्मू आणि काश्मीरच्या प्रभारी म्हणून रजनीताई पाटील यांची निवड केली.तसेच वैद्यकीय प्रवेशासाठी असलेल्या 70:30 कोटा रद्द करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री ना.अमित विलासरावजी देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी पारीत करण्यात आला.