सरस्वती शिशुवाटीकेचा पालक प्रबोधन वर्ग संपन्न
पाचोरा: ज्ञानेश्वर धोंडू पाटील― विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शैक्षणिक प्रगतीबरोबरच कौटुंबिक सुसंस्कार घरातील आनंदी वातावरण व पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे प्रतिपादन जळगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचे प्राचार्य तथा विद्याभारतीचे जळगांव विभाग अध्यक्ष डॉक्टर श्री.विवेक काटदरे यांनी केले पाचोरा येथे स्वामी लॉन्स मध्ये प्रबोधन वर्गात मार्गदर्शन करताना त्यांनी हे विचार व्यक्त केले
देवगिरी प्रांत विद्याभारती संलग्न सरस्वती शिशुवाटिकेच्या पाचोरा शाखेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी व्यासपीठावर श्री ज्ञानदूत बहुऊद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री.सुभाष मोरे, सचिव श्री.संतोष मोरे प्रधानाचार्य सौ भारती मोरे,जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष श्री.मनीष काबरा काबरा,विद्याभारती चे विभाग सह.मंत्री श्री.विकास लोहार उपस्थित होते. आपल्या मुलाने चांगले शिकून मोठे व्हावे अशी सर्वच पालकांची अपेक्षा असते यासाठी पालक वर्ग प्रचंड मेहनत घेत असतो. मात्र केवळ इंग्रजी माध्यम आणि तांत्रिक शिक्षणाने माणूस घडत नसतो तर त्यासाठी कुटुंबात आनंदी आणि विश्वासाचे वातावरण राखले पाहिजे. पालकांनी त्यांच्या इच्छा-आकांक्षा चा बोजा मुलांवर न लादता त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव दिला पाहिजे आणि त्यासाठी मुलांवर विश्वास दाखवला पाहिजे. मुलांच्या मानसिक जडणघडणीत कौटुंबिक वातावरणाचा महत्त्वाचा वाटा असल्याने घरात कलह न ठेवता प्रेम विश्वास सौदा सौदाहर्याचे वातावरण राखावे असा सल्ला यावेळी उपस्थित पालक वर्गाला मार्गदर्शन करताना डॉ काटदरे यांनी दिला. यावेळी त्यांनी मुलांच्या मानसिक प्रगतीचा आलेख दर्शविणाऱ्या स्लाईड शो व व्हिडिओ चा वापर करून उचित दाखले दिले. कार्यक्रमाला संस्थेचे संचालक श्री.योगेश सोनार,श्री.रवींद्र पाटील,श्री.मनोज जाधव सर,यासह विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष मोरे यांनी तर श्री.सुनील पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार सौ.पुष्पा वारुळे यांनी केले.