ब्रेकिंग न्युज

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ द्वारा शालेय शिक्षण मंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांचा राज्यस्तरीय सन्मान

झालेला सन्मान राज्यातील सर्व शिक्षकांना समर्पित

जालना:आठवडा विशेष टीम― जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना दिनांक 17 सप्टेंबर रोजी चितळी पुतळी याठिकाणी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी कोरोणा मुक्तीसाठी धारावीत धारावी पॅटर्न’ यशस्वीरीत्या राबवल्याने तसेच राज्यातील सर्व शिक्षकांचा सन्मान व्हावा यासाठी 5 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर थँक्स अ टीचर मोहीम यंदा प्रथमच सुरू केल्याने त्यांचा कोरोना योद्धा2020 सन्मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय सन्मान महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अरुणराव जाधव ,महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्यमहासचिव तथा राज्य शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक किशोर पाटील कुंझरकर (जळगाव),नेते विलास इंगळे ,पियु आरसू ड, दत्तात्रय माघाडे ,पीपी वाघ, जालना जिल्हा अध्यक्षअच्युत साबळे, जिल्हा सचिव परमेश्वर साळवे, पी डि चव्हाण शांतीलाल खरात राहुल वाहुळे दत्तात्रय सरोदे मारुती पाटोळे आर एस खरात बबन शिंदे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस राजेंद्रजी म्हसदे ,शत्रुघ्न उबरहांडे रवी गंगा तिवरे, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाचे राज्य सचिव बाबुरावजी पवार , राज्य उपाध्यक्षनामदेवराव धुमाळ ,जिल्हाध्यक्ष अण्णा साहेब खिल्लारे, आर जी जोशी , अजित बिदर कर, फय्याज शेख सर, राजकर सर,सिद्धाराम माशाळे राजकिरण चव्हाण, सुजाता भालेराव , रूपाली नामेवार ऋषिकेश वेदपाठक, विकास पोथरे, ए एन जाधव जीआर खरात एस एस जाधव श्रीमती एस ईगळधर, श्रीमती एस सी हिवाळे, आ देि उपस्थित राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते फेटा पुष्पहार सन्मानपत्र मानपत्र देऊनकरण्यात आला.यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने शिक्षकांमधील उत्साह दिसत होता. यावेळी प्रास्ताविकातून माध्यमांच्या द्वारे प्रकाशित झालेल्या राज्यभरातील सर्व शिक्षकांच्या प्रयोगांच्या नवनवीन उपक्रमांच्या बातम्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समितीचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी पीपीटी लॅपटॉप व मनोगतातून लक्षात आणून दिल्या. राज्यात सर्वत्र सर्व शिक्षक ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवण्यासाठी नवनवीन प्रयोग राबवत असल्याची सखोल सविस्तर माहिती पीपीटी द्वारे सविस्तर माहितीआणि मनोगतातून मंत्री महोदयांना दिली. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देताना त्यांनी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभाग तसेच एस सी ईआर टी द्वारे प्राप्त दिनदर्शिका त्यानुसार राज्यातील तंत्रस्नेही प्रयोगशील शिक्षक यांनी सुरू केलेले राज्यभरातील उपक्रम विविध ठिकाणी राज्यातील शिक्षक यांनी पुढे येत संकट काळात सुरू केलेले घर घर शाळा शिक्षण आपल्या दारी, गल्ली मित्र वस्ती शिक्षण मित्र मोहल्ला मित्र, टीव्हीवरील, शाळा वस्तीवरील प्रयोग ,जळगाव जिल्ह्यातील आपला जिल्हा आपला उपक्रम पुस्तिकेच्या चार भागांची माहिती त्याच जोडीने विविध व्हाट्सअप ग्रुप , वेध ग्रुप, एटीएम परिवार, क्रिएटिव टीचर क्लब,सर फाउंडेशन राज्यातील पूर्व अधिकारी व विद्यमान विद्या परिषदेचे शिक्षण संचालक सहसंचालक शिक्षण आयुक्त अधिकारी यांनी सातत्याने राज्यातील सर्व शिक्षकांना केलेले मार्गदर्शन केलेले प्रबोधन त्याच जोडीने राज्यशासन टाटा ट्रस्ट व ब्रिटिश कौन्सिलच्या वतीने इंग्रजी विषयाचे शिक्षकांना धडे देण्यासाठी सुरू असलेला तेजस प्रकल्प त्यातील टॅग कॉर्डिनेटर ची भूमिका,राज्य समता विभागाद्वारे सुरू असलेला बालरक्षक चळवळीचा वैभवशाली प्रवास त्यातील बालरक्षकांचे ऑनलाइन मार्गदर्शन, शिक्षण गप्पा सारखा उपक्रम, अशा राज्यातील विविध ठिकाणी सर्वत्र शासन प्रशासन प्रशिक्षण शाखा विद्या परिषद शालेय शिक्षण विभागाचे जिल्हा परिषद शिक्षण विभाग पालक-शिक्षक शिक्षक संघटना माध्यमा दैनिक विविध शैक्षणिक मासिके जीवन शिक्षण यांच्या समन्वयातून राबवलेल्या प्रयोगांची धावती माहिती अतिशय कमी वेळात परंतु तळमळीने राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी दिली असता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांनी राज्यातील शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले नवनवीन प्रयोगाचा आजच्या या माझ्या सन्मानाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमातून या माध्यमातून पुन्हा उजाळा झाला असून राज्यातील सर्व शिक्षकांचा व शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांचा मला सार्थ अभिमान वाटतो असे म्हटले. व संपूर्ण उपक्रमाचे लेखी दस्तावेज राज्यातील सर्व शिक्षकांनी स्वतःजवळ ठेवावे शिक्षकांनी लिहिते व्हावे वाचन संस्कृती वाढवावी असे त्यांनी सूचित केले.अटीतटीच्या काळात सामाजिक दायित्व प्राणपणाने जपल्या मुळे आपण माझा केलेला सन्मान निश्चितच प्रेरणादायी आहे .महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघ तसेच महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघाने आज आपुलकीने सन्मानित करून दिलेलं सन्मानपत्र सन्मानपत्र देखील प्रेरणादायी आहे मला मिळालेला हा सन्मान मी राज्यातील सर्व डॉक्टर्स नर्सेस पोलीस , कोरणा काळात काम करणारे शिक्षक, त्या जोडीने राज्यातील सर्व शिक्षक ,केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी, सर्व संघटनांचे अधिकारी व शिक्षक तसेच विद्या परिषदेचे सर्व अधिकारी, पालक शाळा व्यवस्थापन समिती लोकप्रतिनिधी यांना समर्पित करते असे म्हटले.त्यांच्या या सकारात्मक भूमिकेने शिक्षणक्षेत्रातील सारेच भारावले. पुढे प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की भविष्यकाळात राज्याला शैक्षणिक दृष्ट्या विकासाकडे व प्रगतीकडे नेणे साठी सर्वांनी समन्वयातून काम करणे गरजेचे असून मुलांना शिक्षित करण्यासाठी शिक्षक तसेच अधिकारी कर्मचारी पूर्वीपेक्षा ठाम उभे आहेत त्यांच्या या कामगिरीला मनापासून सलाम करते असे म्हटले.जेथे जेथे शक्य असेल तेथे पुढाकार घेऊन सर्वांना मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला.आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी नियम पाळून कठीण काळात स्वतःची कुटुंबाची व समाजव्यवस्थेतील सर्वांच्या आरोग्याची काळजी घ्यावी फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळावेत असे त्यांनी म्हटले व सर्व शिक्षक संघटना व शिक्षकांनी दिलेले निवेदने स्विकारुन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन नामदार वर्षाताई गायकवाड यांनी दिले. विधान परिषदेवर नव्यानेच निवड झालेले विधानपरिषद सदस्य राजेश जी राठोड यांचा देखील या वेळी महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने गौरव सन्मान मंत्रीमहोदयांच्या उपस्थिती त करण्यात आला. विजय भोसले साहेबांचे राजू दादा सर्व इतरांचे अनमोल सहकार्य लाभले .राजकिरण चव्हाण व मित्रपरिवार निर्मित सृजनशील शिक्षक वेबसाईट व ॲप चे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने लवकरच राज्यातील सर्व शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रम घेण्यात येणार असून महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ , पदवीधर शिक्षक संघटना,यांचे तसेच शासन,प्रशासन शाखा प्रशिक्षण शाखा शालेय शिक्षण विभाग सर्व अधिकारी, पुणे विद्या प्राधिकरण नाशिक विभागीय प्राधिकरण,सर्व डायट व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी सर्वांचे सातत्याने आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन लाभते असे यावेळी प्रास्ताविकातून बोलताना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी स्पष्ट केले.इतर देशांसारखा माझ्या देशातील माझ्या राज्यातील सर्व शिक्षकांना व्हीआयपी दर्जा मिळावा त्याच जोडीने प्रलंबित सर्व प्रश्नांची सोडवणूक व्हावी ,विधान परिषदेवर आदरणीय राज्यपाल नियुक्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांचा प्रतिनिधी घेण्यात यावा.अशी देखील मागणी त्यांनी यावेळी केली.राज्यातील शिक्षक, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, पदवीधर शिक्षक, डीसीपीएस धारक शिक्षक, अभावीत केंद्रप्रमुख, केंद्रप्रमुख , उर्दू विभागाचे शिक्षक घोषित आणि अघोषित तुकड्या वरील शिक्षक,तसेच विविध संवर्गाच्या शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या निवेदनावर यावेळी चर्चा झाली व निवेदने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड यांना देण्यात आली. सुनील साबळे यांच्या वर्ग पाचवीच्या अभ्यासाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले तर महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी राज्यातील शिक्षकांच्या प्रयोगांच्या संदर्भात तसेच जळगाव जिल्ह्यातील कासोदा बीट संपूर्ण सेमी इंग्रजी माध्यमाचा सर्वांच्या सहकार्याने झाल्याकडे नाशिक डायट, जळगाव डायट द्वारे थँक्स अ टीचर मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आले कडे आणि जळगाव जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात तसेच राज्यातील बहुतांश जिल्हा परिषदांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात सर्व शिक्षकांच्या पुढाकाराने व सर्व शिक्षक संघटनांच्या मदतीने प्रशासनाच्या यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्वत्र नवनवीन प्रयोग सुरू असल्याकडे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री नामदार वर्षाताई गायकवाड व उपस्थितांचे आपल्या खुमासदार शैलीपूर्ण सूत्रसंचालन व प्रास्ताविकातून कुंझरकर शैलीत लक्ष वेधले. चितळी पुतळी चे लोकप्रतिनिधी माधवराव टकले काका यांचे विशेष सहकार्य लाभले त्यांनी त्यांचा फंक्शन हॉल उपलब्ध करून दिला. फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळून शिक्षकांमधील उत्साह या कार्यक्रमात दिसत शालेय शिक्षणमंत्र्यांनी संवाद साधून सर्व उपस्थितांमध्ये शालेय शिक्षण मंत्री यांनी संवाद साधून सर्व उपस्थितांमध्ये प्रेरणा निर्माण केली.महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाच्या वतीने आयोजक या नात्याने राज्याध्यक्ष अरुणराव जाधव यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button