बातम्या
FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ? FMGE Hunger Strike: MPs Back FMGE Marks Compensation as Hunger Strike Hits Critical Day 7 FMGE June 2026 Crisis: Indefinite Fast Enters Day 5; Protesting Doctors Issue 5:00 PM Final Ultimatum to NBEMS, Announce Nationwide District-Level Hunger Strikes प्रशासनाचा भोंगळ कारभार: FMGE June 2026 च्या ३८,००० डॉक्टरांचे दिल्लीत बेमुदत उपोषण! शेतकऱ्यांनो लक्ष द्या! महाडीबीटीवरील कुंपण अनुदान सर्वांसाठी नाही; पाहा नेमकी पात्रता काय? फडणवीस सरकार मुर्दाबादच्या घोषणांनी पाटोदा दणाणला; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या जी.आर.ची होळी बीड जिल्ह्यात डिझेलची तीव्र टंचाई; महाजनवाडी पेट्रोल पंपावर नागरिकांची अलोट गर्दी ३०० कोटी वृक्षलागवड: ‘रेकॉर्डब्रेक’ बीड प्रशासनाला हरित आयोगावर संधी द्या; डॉ. गणेश ढवळे यांची राज्य सरकारकडे मागणी अखेर ५ कोटी खर्चून उभारलेल्या च-हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; ९ वर्षांचा ‘अंधारातून उजेडाकडे’ प्रवास पूर्ण, जलसमाधी आंदोलनाचे यश : डॉ. गणेश ढवळे डॉ. लक्ष्मण जाधव यांची लोकशाही पत्रकार संघाच्या आरोग्य विकास समितीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड बीड बसस्थानक गळती प्रकरण: काझी संघाणी ग्रुपला एसटी महामंडळाची नोटीस, राजकीय वरदहस्तामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ?

औरंगाबाद जिल्हा: सोयगावला मुसळधार ,सावळदबारा मंडळात अतिवृष्टीची नोंद

सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― सोयगावसह तालुक्यात शनिवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली यामध्ये सोयगाव मंडळात मुसळधार तर सावळदबारा मंडळात ७५ मी.मी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

बनोटी पाठोपाठ पावसाने सोयगाव आणि सावळदबारा मंडळात धुमाकूळ घातला आहे.यामध्ये सावळदबारा मंडळातील बारा गावात अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने कपाशी पिके आडवे पडून सोयाबीनच्या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.सोयगाव मंडळातील गलवाडा,रावेरी,कंकराळा, सोयगाव आदी भागात मुसळधार पावूस कोसळला यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा असल्याने सोयगाव मंडळात कपाशी पिकांवरील नवीन लागलेला कापूस भिजला आहे.काही भागात कपाशी पिकांचे ओझ्याने वाकून कंबरडे मोडले आहे.सावळदबारा मंडळातील बारा गावात सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले दरम्यान रविवार सुटीचा दिवस असल्याने पंचनाम्यांच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झालेला आहे.सावळदबारा मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जरंडीला विजांच्या कडकडाटाचा चमत्कार-

जरंडी परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसात विजांचा कडकडाट जोरदार होता तब्बल वीस मिनिटे विजांचा लक्ख प्रकाश जमिनीवर असल्याचे जरंडीकरांनी अनुभवल्याने गावात या विजांच्या चमत्काराने घबराट पसरली होती.वादळी वाऱ्याचे प्रमाण जोरात असल्याने जरंडी परिसरात कपाशी पिके आडवी पडली आहे.

सोयगाव आणि सावळदबारा मंडळात मुसळधार पावूस झाल्याच्या नोंदी आहे.यामध्ये सोयगाव मंडळात ५० मी.मी तर सावळदबारा मंडळात ७५ मी.मी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे.त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान क्षेत्राची माहिती संकलित करून पंचनाम्यांचे आदेश देण्यात येतील.

―प्रविण पांडे ,तहसीलदार सोयगाव

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *