अंबाजोगाई तालुकाबीड जिल्हाशैक्षणिक

संकेत मोदीने अमेरीकेच्या पेनसिल्व्हेनीया स्टेट युनिव्हर्सिटीतून विशेष प्राविण्यासह मिळविली ‘अॅक्चुरीयल रिस्क मॅनेजमेंट' पदवी

अंबाजोगाई (प्रतिनिधी): येथील संकेत राजकिशोर मोदी हा अमेरीकेतील पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतून आभासी जोखिम व्यवस्थापन (Acturial Science of Risk Management) या विषयातील पदवी परिक्षा विशेष प्राविण्याने उत्तीर्ण झाला आहे.अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीने नुकताच सदरील परिक्षेचा निकाल जाहिर केला आहे.संकेत मोदी याने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

संकेत मोदीने प्राथमिक शिक्षण अंबाजोगाईच्या न्यु व्हिजन पब्लिक स्कुल व माध्यमिक शिक्षण जोधाप्रसादजी मोदी कनिष्ठ महाविद्यालयातून पुर्ण केले.पुढील उच्च शिक्षणासाठी संकेतने पेनसिल्व्हेनिया या विद्यापीठाची निवड केली व पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.त्यात विमा विभागाशी निगडीत असणार्‍या “आभासी
जोखिम व्यवस्थापन (Acturial Science of Risk Management)" हा विषय त्याने पदवी अभ्यासक्रमासाठी निवडला.त्यात त्याने विशेष यश संपादन केले आहे.अमेरीकेची पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटी ही जगातील एक नामांकित युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते.त्यामुळे संकेत याने पुर्ण केलेला विमाशास्त्र अभ्यासक्रमाला विशेष महत्व आहे.गणित, सांख्यिकीशास्त्र यासह ‘विमाशास्त्र' या विषयावर त्याने आपला चार वर्षीय (बी.एस.) पदवी अभ्यासक्रम यशस्विरित्या पुर्ण केला आहे.हा अभ्यासक्रम विमा प्रणालीशी निगडीत असून सांख्यिकी व गणित या विषयाला जोडून होता. तसेच यात आभासी जोखिम व्यवस्थापन (अॅक्चुरियल रिस्क मॅनेजमेंट) हा महत्वपुर्ण विषय घेवून संकेतने आपले शिक्षण पुर्ण केले.संकेत हा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांचा मुलगा आहे. मोदी परिवाराची उच्च शिक्षणाची परंपरा संकेत मोदी यानेही पुढे कायम सुरू ठेवली आहे.संकेतने प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्याचे सर्वस्तरांतून अभिनंदन होत आहे.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.