पाटोदा तालुकाबीड जिल्हा

महीला दिना निमित्त रणरागिणीने हाताळला पाटोदा पोलीस ठाण्याचा कारभार

पाटोदा (शेख महेशर): महीला दिना निमित्त पाटोदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक एस.जे. माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबवून महीलांना प्रोत्साहन देण्यात आले. पोलीस ठाण्यातील महीलांचे स्वागत करुन. दिवसभर पोलीस ठाण्याच्या कारभाराची सुत्रे कार्यरत महीला कर्मचाऱ्यांच्या हातात देण्यात आले. पाटोदा पोलीस ठाण्यात सध्या सात महीला कर्मचारी कार्यरत आहेत. शुक्रवारी नागरिकांच्या सुरक्षेची दोर महीला कर्मचाऱ्यांच्या हाती होती. विशेष म्हणजे या महीला कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षिते बरोबरच कुटुंबाची जबाबदारी ही समर्थ पणे पेलत आहेत. महीला दिना निमित्त आयोजित उपक्रमात पोलीस ठाणे अंमलदार म्हणून पोलीस नाईक अयोध्या खाडे यांनी काम पाहिले. तर कर्मचारी मिरा सोनपावले, पंचफुला गंधकवाड, शितल जायभाये रुक्साना सय्यद, भाग्यश्री भालेराव, यांनी सहकार्य केले. सकाळ पासुनच महीला पोलीस कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या विविध तक्रारी ऐकुन त्या वर तोडगा काढला. दिवसभराच्या बंदोबस्ताचे नियोजन करत इतर जवाबदाऱ्याही चोखपणे पार पडलेल्या.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.